-
निरोगी राहाण्यासाठी सकाळचा नाश्ता महत्त्वाचा.
-
निरोगी शरीरासाठी तुमचा आहार अत्यंत महत्त्वाचा आहे.
-
तुम्ही काय खाता, किती प्रमाणात खाता, कोणत्या वेळी खाता या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आहार म्हटलं की, सकाळचा नाश्ता हा आलाच.
-
सकाळचा नाश्ता केल्याने वजन जास्त वाढतं, असं म्हटल्या जाते. पण खरंच असं होतं का?
-
तज्ज्ञांच्या मते, खरतंर सकाळचा नाश्ता हा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचा आणि फायदेशीर असतो.
-
सकाळचा अगदी भरपेट नाश्ता केला तर तुम्ही दिवसभर तजेलदार राहता. काम करण्याची ऊर्जा मिळते.
-
सकाळच्या नाश्त्यात साधारणपणे २६० कॅलरीज असतात. त्यामुळे सकाळचा नाश्ता जर पोटभर केला तर त्यानंतर आपण शरीराची हालचाल करणे गरजेचे आहे.
-
सकाळच्या नाश्त्यात आपण कोणता आहार घेतो हे सुध्दा वजन वाढविण्यास कारणीभूत ठरु शकते.
-
नाश्ता टाळून किंवा नाश्त्याला चुकीचे पदार्थ खाऊन वजन वाढण्याला आपण स्वत: आमंत्रण देतो. हे टाळायचं असेल तर योग्य पदार्थांचा समावेश करुन सकाळचा नाश्ता करावा.
-
त्यामुळे शक्यतो सकाळच्या नाश्त्यात पौष्टीक आहार आपण घेतला पाहिजे.
-
सकाळी नाश्त्याला साखर घालून पदार्थ करण्यापेक्षा नैसर्गिकरित्या गोड असणारं केळ खाणं योग्य ठरतं.
-
गव्हापासून बनलेली ब्रेड आणि मोड आलेले कडधान्य, प्रोटीनसाठी ब्रेड-ऑम्लेट, फळं, सुका मेवा, दही खाऊ शकता. हलकं-फुलकं खायचं असेल तर फळं, केळ, पालक, ब्रेड खाऊ शकता.
-
वजनाचे मॅनेजमेंट करण्यासाठी काही ठराविक गोष्टी नियमित करण्याची आवश्यकता असते. या गोष्टी कोणत्या वेळेला, किती प्रमाणात आणि कशापद्धतीने करायच्या याची माहिती असायला हवी.
-
पोषण घटकांचा एकत्रित समावेश असलेला प्रकार म्हणजे स्मुदीज. तसेच सकाळच्या नाश्त्याला स्मुदी प्याल्याने वजन कमी होण्यास चालना मिळते.
-
(फोटो सौजन्य : संग्रहित छायाचित्र)

अखेर मुसक्या आवळल्या, स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला पुणे पोलिसांनी केली अटक