-
दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला देशभरात रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. हा सण भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे ते प्रतीक आहे.
-
रक्षाबंधन या शब्दाचा अर्थ सुद्धा या नात्याइतकाच सहज व सोपा आहे. भावंडांनी एकमेकांची कठीण काळात रक्षा करायची आठवण करून देणारे एक बंधन यादिवशी राखीच्या रूपात हातावर बांधले जाते.
-
यंदा 30 आणि 31 ऑगस्टला संपूर्ण देशात रक्षाबंधन हा सण साजरा केला जाणार आहे.
-
ज्योतिषशास्त्रानुसार, भावाच्या राशीनुसार विशिष्ट रंगाची राखी बांधणे भावासाठी अतिशय शुभ ठरू शकते.
-
मेष राशीचे लोक अतिशय ऊर्जावान असतात. या लोकांसाठी लाल रंगाची राखी शुभ ठरू शकते.
-
वृषभ राशीचे लोक अत्यंत व्यवहारी मानले जातात. वाढ आणि स्थिरतेचे प्रतीक असणाऱ्या हिरव्या रंगाची राखी या लोकांसाठी शुभ ठरू शकते.
-
पिवळ्या रंगाची राखी मिथुन राशीच्या लोकांच्या आनंदी स्वभावाचे प्रतिनिधीत्व करते.
-
कर्क राशीचे लोक अतिशय प्रेमळ मानले जातात. पांढऱ्या रंगाची राशी त्यांच्या प्रेमळ स्वभावाचे प्रतीक मानली जाते.
-
सोनारी रंगाची राखी सिंह राशीच्या लोकांच्या नेतृत्व कौशल्याचे प्रतिनिधीत्व करते.
-
कन्या राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्ट नीटनेटकेपणाने करणे पसंत असते. अशा लोकांसाठी निळ्या रंगाची राखी उत्तम ठरू शकते.
-
गुलाबी रंगाची राखी तूळ राशीच्या लोकांच्या वचनबद्धतेचे प्रतीक ठरते.
-
वृश्चिक राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्त अत्यंत उत्कट असल्याने त्यांच्यासाठी मरुन रंगाची राखी शुभ ठरू शकते.
-
जांभळा रंग धनू राशीच्या लोकांच्या कल्पकतेचे प्रतीक आहे.
-
मकर राशीचे लोक अतिशय शिस्तबद्ध असतात. या लोकांसाठी तपकिरी रंगाची राखी शुभ ठरू शकते.
-
कुंभ राशीचे लोक चौकटीबाहेरचा विचार करण्यात तरबेज असतात. या लोकांसाठी चंदेरी रंगाची राखी उत्तम ठरू शकते.
-
मीन राशीचे लोक अतिशय संवेदनशील असतात. या लोकांसाठी पिस्ता रंगाची राखी शुभ ठरू शकते.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.
-
(Photos: Freepik/Pexels/Pixabay/Unsplash)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख