-
हिंदू धर्मानुसार, श्रावण महिन्याला आध्यात्मिक महत्त्व आहे. शंकराचा प्रिय महिना म्हणून श्रावण महिना ओळखला जातो. (Photo : Pexels)
-
या पवित्र महिन्यात अनेक भक्त शिवशंकराची पूजा करतात, पण तुम्हाला माहिती आहे का ज्योतिषशास्त्रात सांगितल्याप्रमाणे तीन राशी शिवशंकराच्या प्रिय राशी मानल्या जातात. (Photo : Pexels)
-
या राशींच्या लोकांची शिवशंकर नेहमी रक्षा करतो आणि त्यांना प्रत्येक संकटातून वाचवतो. त्या तीन राशी कोणत्या? चला तर जाणून घेऊ या. (Photo : Pexels)
-
मेष राशी शंकराची प्रिय रास मानली जाते. या राशीवर शंकराची नेहमी कृपा असते. (Photo : Pexels)
-
जीवनात कोणत्याही अडचणी आल्या, तरी या राशीच्या व्यक्ती शंकराच्या आशीर्वादाने त्यातून मार्ग काढतात. (Photo : Pexels)
-
मकर राशी शंकराची प्रिय राशींपैकी एक आहे. यांच्यावर नेहमी शंकराचा आशीर्वाद असतो. (Photo : Pexels)
-
ज्योतिषशास्त्रानुसार या राशीचे स्वामी शनि आहे. शनिदेवानेसुद्धा शिवशंकराला प्रसन्न केले होते, त्यामुळे शनि राशीचे स्वामित्व असणाऱ्या राशीवर शंकराची कृपा असते. (Photo : Pexels)
-
कुंभ रास ही शंकराची अत्यंत प्रिय रास आहे. या राशीचे लोक नेहमी सुख समाधानाने आयुष्य जगतात. (Photo : Pexels)
-
मकर राशीप्रमाणे या राशीचे स्वामीसुद्धा शनि असतात. त्यामुळे ही रास शंकराची अत्यंत खास रास मानली जाते. (Photo : Pexels)
महिलांनो आता मेथीची भाजी निवडायचं टेन्शन कायमचं गेलं; या भन्नाट ट्रीकनं ५ मिनिटांत मेथी साफ, VIDEO पाहून अवाक् व्हाल