-
Shree Krishna Janmashtami 2023: हिंदू पौराणिक कथांमध्ये कृष्ण जन्माष्टमीला विशेष महत्त्व आहे.
-
विष्णूचा आठवा अवतार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कृष्णकन्हैयाचा जन्मदिन म्हणजे देशभरातील भाविकांसाठी एक सोहळाच असतो.
-
यंदा भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाची अष्टमी तिथी ६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजून ३७ मिनिटांनी सुरू होणार आहे; जी ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजून १४ मिनिटांनी समाप्त होईल.
-
सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून घरातील मंदिरात स्वच्छता करावी.
-
घरातील मंदिरात दिवा लावावा.
-
जन्माष्टमीला श्रीकृष्णाला श्रुंगार केल्यानंतर अष्टगंध, कुंकुवाचा तिलक लावावा.
-
त्यानंतर माखन मिश्री आणि इतर नैवेद्याचे पदार्थ अर्पण करावे.
-
त्यांनतर श्रीकृष्णाच्या विशेष मंत्राचा जप करावा.
-
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या नैवेद्यात पंचामृत अर्पण करावी. त्यात तुळशीची पाने घाला.
-
पुरणाचा नैवैद्य या पूजेला करू शकता.
-
काही ठिकाणी श्रीखंड पुरीचा नैवैद्यही दाखविला जातो.
-
या दिवशी श्रीकृष्णाला सर्व प्रकारचे पदार्थ असलेले संपूर्ण सात्विक अन्न अर्पण केले जाते.
-
या दिवशी रात्रीच्या पूजेला महत्त्व आहे, कारण भगवान श्रीकृष्णाचा जन्म रात्री झाला होता.
-
विसर्जनासाठी फुले तांदूळ मूर्तीवर अर्पण करावे आणि शेवटी प्रसादाचे वाटप करावे.
Devendra Fadnavis : ‘मी शिंदेंना सांगणार, कडक समज द्या, अन्यथा…’, संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून फडणवीसांचा मोठा इशारा