-
पावसाळ्यात भाज्यांमध्ये अळ्या दिसून येतात. अशात कोणत्या भाज्या खाव्यात आणि कोणत्या भाज्या खाऊ नये हे समजत नाही. (Photo : Freepik)
-
फ्लॉवरमधील अळ्या शोधणे ही खूप कठीण गोष्ट आहे. (Photo : Freepik)
-
जर तुम्हालाही फ्लॉवरमधील अळ्या बाहेर काढायच्या असतील तर तुम्ही ही सोपी ट्रीक वापरू शकता. (Photo : Freepik)
-
फ्लॉवरमध्ये अनेकदा अळ्या लपलेल्या असतात. स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतरही अळ्या बाहेर येत नाही. (Photo : Freepik)
-
अशा वेळी ही सोपी ट्रीक फायदेशीर ठरू शकते. (Photo : Freepik)
-
फ्लॉवरमधील अळ्या बाहेर काढायच्या असतील तर आधी फ्लॉवरचे छोटे छोटे तुकडे करा.यामुळे अळ्या सहज बाहेर पडू शकतात. (Photo : Freepik)
-
एका भांड्यामध्ये मीठ टाका आणि त्यात १०-१५ मिनिटांसाठी फ्लॉवरला भिजवून ठेवा. (Photo : Freepik)
-
डिहायड्रेशनमुळे सर्व अळ्या झटक्यात बाहेर पडतील. त्यानंतर तुम्ही फ्लॉवर स्वच्छ पाण्याने धुवून वापरू शकता. (Photo : Freepik)
-
याशिवाय तुम्ही कोमट पाण्यात हळद आणि मीठ टाकून १०-१५ मिनिटांसाठी फ्लॉवरला भिजवून ठेवा. यामुळे फ्लॉवरमध्ये अळ्या असतील तर त्या बाहेर पडू शकतात. (Photo : Freepik)
१४ फेब्रुवारी पंचांग: सुकर्मा योगात १२ राशींचा कसा जाणार दिवस? कोणाला राहावे लागेल मतांवर ठाम, तर कोण होईल धनवान; वाचा तुमचे राशिभविष्य