-
आरोग्याच्या दृष्टीने टॉयलेट-बाथरुम स्वच्छ असणे खूप गरजेचे आहे. परंतु कित्येकवेळा टॉयलेट-बाथरुम साफ केले तरी त्यातून दुर्गंध येतो. त्यामुळे आम्ही काही सोपे किचन हॅक्स तुम्हाला सांगणार आहोत, ते टॉयलेटची साफसफाई करण्यात मदत करू शकतात.(Photo – Freepik)
-
तुम्ही कधी बाटलीच्या झाकणाने टॉयलेट क्लिन केलं आहे का? हो बाटलीच्या झाकणानेही टॉयलेट क्लिन करता येतं. एका गृहिणीने हा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. या हटके जुगाडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.(Photo – Freepik)
-
सर्वात आधी एक भांडं घ्या. त्यात बेकिंग सोडा, मीठ, डिटर्जंट पावडर प्रत्येकी एक चमचा टाका. यात चमचाभर टूथपेस्ट टाकून अर्धा लिंबू पिळून घ्या. आता हे सर्व एकत्र करा. याची एक पेस्ट तयार होईल.(Photo – Freepik)
-
मिश्रण थोडं हातात घेऊन हातांनी दाबून त्याचे गोळे होतात का ते पाहा. आता बाटलीचं झाकण घ्या. त्यात हे मिश्रण भरा आणि बाहेर काढा. बाटलीच्या झाकणाच्या आकाराच्या गोळ्या तयार करून घ्या. (Photo – Freepik)
-
एक गोळी या झाकणातच ठेवा. एक प्लॅस्टिक पिशवी घेऊन त्याचा छोटा भाग कापून तो या झाकणावर गुंडाळा.(फोटो – @Puneritadka)
-
मिश्रण असलेल्या भागाकडून कात्रीने ३-४ छेद करून घ्या. आता याला एक दोरी बांधा आणि हे झाकण टॉयलेट फ्लश टॅन्कमध्ये टाका.(फोटो – @Puneritadka)
-
अर्धी दोरी बाहेर ठेवा. ही तुमची होममेड टॉयलेट क्लिनर टॅबलेट तयार झाली. जेव्हा तुम्ही फ्लश कराल तेव्हा झाकणातील थोडं मिश्रण बाहेर पाण्यात येईल आणि तुमचं टॉयलेट स्वच्छ होईल.(फोटो – @Puneritadka)
-
तुमच्या घरी पांढरे व्हिनेगर असेल तर ते टॉयलेट पॉटमध्ये ओता आणि रात्रभर सोडा. किमान दोन कप व्हाईट व्हिनेगर वापरा.(फोटो – @Puneritadka)
-
कोका-कोलासुद्धा व्हिनेगरप्रमाणेच काम करू शकते. पण ते १ तासापेक्षा जास्त काळ सोडू नका. फक्त पॉटचे डाग काढून टाका.(फोटो – @express)