-
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा कोणताही ग्रह अस्त होती तेव्हा त्याची शक्ती शीण होते असे मानले जाते. तर उदयस्थितीत तो ग्रह सर्वाधिक शक्तिशाली असतो.
-
काही दिवसांपूर्वी १५ ऑगस्टला ग्रहमालेतील सर्वात महत्त्वाचा मानला जाणाऱ्या शनीचा कुंभ राशीत उदय झाला आहे.
-
कुंभ ही शनीच्या स्वामित्वाची रास मानली जाते. या ठिकाणी आता शनी संपूर्ण शक्तीसह भ्रमण करत आहे.
-
साहजिकच शनीचा हा प्रभाव अन्य काही राशींसाठी सुद्धा लाभदायक ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार चार अशा राशी आहेत ज्यांना येत्या अनंत चतुर्दशीपर्यंत श्रीगणेश व शनी महाराज दोघांचे आशीर्वाद लाभू शकतात.
-
मेष रास: मेष राशीच्या मंडळींना कामाच्या ठिकाणी खूप कौतुक व मोठा धनलाभ होऊ शकतो. वाडवडिलांची संपत्ती या काळात तुम्हाला दुप्पट धनलाभ मिळवून देत कोट्याधीश करू शकते
-
वृषभ रास: शनिदेवाची विशेष कृपा तुमच्यावर असणार आहे. शनीच्या कृपेने तुमची सर्व कामे मार्गी लागू शकतात व यातून अनपेक्षित व मोठा धनलाभ होऊ शकतो. तुमच्या नशिबात नोकरी बदलाचे संकेत आहेत.
-
मिथुन रास: मिथुन राशीला जागृत अवस्थेतील शनिदेव तगडा लाभ मिळवून देणार आहेत. तुमची एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते. परदेश प्रवासाची चिन्हे नशिबात आहेत. आर्थिक मिळकत वाढेल पण खर्चावर नियंत्रण ठेवा
-
तूळ रास: तूळ राशीसाठी गणेशोत्सव पूर्णपणे आनंददायी असणार आहे. शनी महाराजांची कृपा तुमच्यासह तुमच्या कुटुंबावर व प्रियजनांवर सुद्धा राहणार आहे. वाहन खरेदीचे शुभ योग आहेत. पैशांपेक्षा अधिक महत्त्व नात्यांना द्यावे लागू शकते.
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”