-
प्रत्येक धर्मात लग्नाच्या वेळी वेगवेगळ्या रूढी-परंपरा असतात. या रूढी-परंपरांचे विशेष महत्त्व असते. हिंदू धर्मात अशीच एक परंपरा आहे. या परंपरेनुसार हिंदू धर्माच्या लग्नात नवरदेव घोडीवर बसतो. (Photo : Instagram)
-
तुम्हाला माहीत आहे का नवरदेव घोडीवरच का बसतो; घोड्यावर का नाही? आणि तेही पांढऱ्याच घोडीवर का? आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत. (Photo : Instagram)
-
लग्नात नवरदेवाने घोडीवर बसणे ही परंपरा खूप जुनी आहे. असं म्हणतात की, रामायण-महाभारतापासून ही परंपरा पाळली जाते. (Photo : Instagram)
-
अनेक जण लग्नात घोडीवर बसले असतील किंवा काही लोक भविष्यात बसणार असतील. मग तुम्हाला या परंपरेमागील कारण माहीत असायला हवे. (Photo : Instagram)
-
असं म्हणतात की, घोडा हा रागीट स्वभावाचा असतो. कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय घोड्यावर सैर करणे खूप कठीण आहे. घोड्याच्या या चपळ स्वभावामुळेच घोड्याला पूर्वी युद्धभूमीवर वापरले जायचे; पण लग्नात घोड्याच्या रागीट, चपळ व शक्तिवान या गुणांचा काहीही फायदा होत नसतो. (Photo : Instagram)
-
उलट लग्नात त्यागाला अधिक महत्त्व दिले जाते. घोड्याच्या तुलनेत घोडी अधिक शांतताप्रिय असते. त्यामुळे नवरदेव लग्नात घोड्यावर नाही, तर घोडीवर बसतो. (Photo : Instagram)
-
लग्नात नवरदेव घोडीवर बसतो आणि त्याचा अर्थ मुलगा नव्या आयुष्याची सुरुवात करीत आहे. अशात तो वैवाहिक आयुष्याची जबाबदारी उचलण्यास सक्षम आहे की नाही, हे सिद्ध करण्यासाठी नवरदेवाला घोडीवर बसवण्याची प्रथा आहे. (Photo : Instagram)
-
तुम्ही अनेकदा पाहिले असेल की, नवरदेव पांढऱ्या घोडीवर बसतो; पण पांढरीच घोडी का? पांढरी घोडी ही शुद्धता, प्रेम, उदारता, शांतता, सौभाग्य व समृद्धीचं प्रतीक असते. (Photo : Instagram)
-
या गुणांमुळे वैवाहिक आयुष्य आणखी समृद्ध होण्यास मदत होते. त्यामुळे लग्नात नव्या आयुष्याची सुरुवात करताना नवरदेव पांढऱ्या घोडीवर बसतो. (Photo : Instagram)

‘झी मराठी’च्या नायिकेने दिली प्रेमाची कबुली; होणार ऐश्वर्या व अविनाश नारकरांची सून, ‘लग्न झालंय का?’ विचारताच म्हणाली…