-
लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना महाप्रसाद प्रचंड आवडतो. अनेकजण आवडीने महाप्रसादातील मसालेभात खातात. (Photo : Social Media)
-
अनेकदा प्रयत्न करुनही महाप्रसादासारखा टेस्टी मसालेभात घरी बनवता येत नाही पण तुम्हाला असा मसालेभात घरी बनवायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला खास पद्धत सांगणार आहोत. (Photo : Social Media)
-
चला तर जाणून घेऊ या घरच्या घरी महाप्रसादासारखा टेस्टी मसाले भात कसा बनवायचा? (Photo : Social Media)
-
साहित्य : तांदूळ, बटाटा, कोबी, मटर, जिरे, आलं, कडीपत्ता, हिंग, हिरवी मिरची, टोमॅटो, हळद, तेल, मोहरी, कांदा, शेंगदाणे, लाल तिखट, पाणी, मीठ, गरम मसाला, धनेपूड (Photo : Social Media)
-
सुरुवातीला तांदूळ दोनदा धूवून एका भांड्यामध्ये पाण्यात भिजून ठेवा. त्यानंतर कमी आचेवर गॅसवर कुकर ठेवा. त्यात थोडं तेल टाका. (Photo : Social Media)
-
तेल गरम झाल्यावर त्यात सुरुवातीला जीरे मोहरी कडीपत्ता हिंग, आलं पेस्ट,हिरवी मिरची, कांदा टाका आणि चांगले परतून घ्या. (Photo : Social Media)
-
त्यानंतर त्यात धने पुड, गरम मसाला, हळद, लाल तिखट, मीठ टाकून चांगल्याने परतून घ्या. त्यानंतर टोमॅटो टाका. थोडा वेळ झाल्यानंतर त्यात बटाटा आणि बारीक चिरलेली कोबी टाका. (Photo : Social Media)
-
थोड्या वेळाने पाण्यात भिजवलेले तांदूळ त्यात मिक्स करा. तांदूळ मिक्स झाल्यानंतर त्यात गरजेनुसार पाणी टाका. (Photo : Social Media)
-
कुकरचे झाकण लावा आणि मंद आचेवर कुकरच्या दोन शिट्ट्या होऊ द्या. तुम्ही मसालेभाताबरोबर कढी करू शकता. (Photo : Social Media)
![Ajit Pawar On Chhagan Bhujbal](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/12/New-Project-2024-12-22T223603.355.jpg?w=300&h=200&crop=1)
Ajit Pawar : छगन भुजबळांच्या नाराजीवर अजित पवारांचं मोठं भाष्य; म्हणाले, “थोडसं थांबायला सांगितलं तर काहींनी…”