-
केळी असे फळ आहे, जे प्रत्येक ऋतूमध्ये सहज उपलब्ध असतात. केळी खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. (Photo : Pexels)
-
अनेकजण उपवासाला केळी खातात, कारण केळी खाल्ल्यामुळे आपल्याला इन्स्टंट एनर्जी मिळते. (Photo : Pexels)
-
पण, केळी खरेदी करून आणल्यानंतर तुम्ही घरी फ्रिजमध्ये ती ठेवता का? अशी चूक कधीही करू नका. (Photo : Pexels)
-
आज आपण फ्रिजमध्ये केळी ठेवणे किती धोकादायक असते, याविषयी सविस्तर जाणून घेऊ या. (Photo : Pexels)
-
केळीची शेती उष्ण वातावरणात केली जाते. त्यामुळे केळीला आपण जास्त वेळ थंड ठिकाणी ठेवू शकत नाही. (Photo : Pexels)
-
थंड ठिकाणी ठेवल्यानंतर केळी काळी पडतात आणि खाण्यायोग्य राहत नाही. जेव्हा तुम्ही केळी फ्रिजमध्ये ठेवता तेव्हा ऑक्सीडाइज एन्जाइम तयार होतो, ज्यामुळे केळी खराब होऊ शकतात. (Photo : Pexels)
-
जर केळी पिकलेली नसतील तर तुम्ही फ्रिजमध्ये ठेवू शकता. पण, केळी पिकल्यानंतर लगेच फ्रिजच्या बाहेर ठेवा, कारण जास्त दिवस केळी फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे लवकर खराब होऊ शकतात. (Photo : Pexels)
-
केळी ताजी ठेवायची असतील तर केळीच्या देठावर फॉइल पेपर किंवा प्लास्टिक किंवा एखादा कागद गुंडाळा. (Photo : Pexels)
-
याशिवाय केळी नेहमी हॅन्गरवर लटकवून ठेवा. टोपलीत किंवा भांड्यामध्ये चुकूनही केळी ठेवू नका. (Photo : Pexels)
![S Jaishankar On Deportation](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/S-Jaishankar-On-Deportation.jpg?w=300&h=200&crop=1)
S. Jaishankar : अमेरिकेने भारतीय नागरिकांना बेड्या का घातल्या होत्या? परराष्ट्रमंत्री म्हणाले, “टॉयलेट ब्रेकवेळी…”