-
आयुष्यात अनेक लोकांना ब्रेकअपचा सामना करावा लागतो. (Photo : pexels)
-
ब्रेकअप म्हणजे दोन व्यक्तींमध्ये असलेलं नातं संपुष्टात येणं होय. कोणत्याही नात्यात मतभेद निर्माण झाले की, नातं ब्रेकअप होण्याच्या मार्गावर असतं. (Photo : pexels)
-
ब्रेकअप झाल्यानंतर भावना दुखावतात आणि कधी कधी व्यक्तीला नैराश्य येतं. अशा वेळी व्यक्तीला काय करावं हे कळत नाही. (Photo : pexels)
-
आयुष्यात पुढे कसं जायचं, याविषयी काहीही सुचत नाही; पण आज आम्ही तुम्हाला याविषयी सांगणार आहोत. (Photo : pexels)
-
ब्रेकअपनंतरचा काळ हा खूप वेदनादायी असतो. अशा वेळी स्वत:ला सावरा. एखाद्या प्रिय व्यक्तीपासून दूर होणं कठीण आहे; पण स्वत:ला वेळ द्या आणि हळूहळू यातून बाहेर पडा. (Photo : pexels)
-
स्वत:चं दु:ख समजून घ्या आणि स्वत:ला मानसिकदृष्ट्या मजबूत करा. (Photo : pexels)
-
ब्रेकअपनंतर स्वत:ला वेळ देणं खूप गरजेचं आहे. स्वत:ला बिझी ठेवणं, हा ब्रेकअपमधून बाहेर पडण्याचा सर्वांत चांगला मार्ग आहे. (Photo : pexels)
-
तुम्ही जितकं जास्त कामात व्यग्र राहाल तितका तुम्ही रिलेशनशिप आणि तुमच्या जोडीदाराविषयी कमी विचार कराल. याशिवाय चांगला आहारसुद्धा तुम्हाला निरोगी राहण्यास मदत करू शकतो. (Photo : pexels)
-
जर ब्रेकअपनंतर तुमच्या भावना दुखावल्या असतील, तर स्वत:ला धीर द्या आणि यातून बाहेर पडा. तुम्ही खूप मौल्यवान असल्यामुळे स्वत:ला अधिक महत्त्व द्या. त्यामुळे तुम्ही सकारात्मक दृष्टीनं ब्रेकअपमधून बाहेर पडू शकता. (Photo : pexels)

IND vs BAN: “मी उद्या अक्षरला…, स्वत:मुळे अक्षर पटेलची हॅटट्रिक हुकल्यानंतर रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, भारताच्या विजयानंतर काय म्हणाला?