-
निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी अनेक पाककृती आहेत. बरेच लोक महाग सौंदर्यप्रसाधने वापरतात. परंतु नैसर्गिकरित्या चमकदार त्वचेसाठी योग्य आहार आणि नियमित व्यायाम अत्यंत आवश्यक आहे.
-
येथे १० खाद्यपदार्थांची यादी दिली आहे, ज्यामुळे तुमच्या त्वचेचं आरोग्य सुधारेल. परंतु हे पदार्थ सर्वांसाठीच उपायकारक ठरत नाहीत.
-
ओट्स : ओट्स त्वचेची निगा राखण्यास मदत करतात. हे मृत त्वचेच्या पेशी काढून नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते. यामध्ये बीटा-ग्लुकन असते. ज्यामुळे तुमची त्वचा चमकते.
-
पपई : पिकलेल्या पपईमध्ये ‘व्हिटॅमिन ए’ आणि ‘पपेन एंझाइम’ असते. जे त्वचेच्या मृत पेशी आणि निष्क्रिय प्रथिने काढून टाकण्यास मदत करते. त्यामुळे तुमची त्वचा टवटवीत होते.
-
बदाम:केसांच्या आरोग्यासाठी बदाम किती फायदेशीर आहेत, हे आपल्याला माहीत आहे. पण, या बदामाचे त्वचेसाठीही अनेक फायदे आहेत. बदामामध्ये ओलिन ग्लिसराइड लिनोलिक अॅसिड असते. तसेच यामध्ये ‘व्हिटॅमिन ई’ मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे तुमची त्वचा उजळण्यास मदत होते.
-
डार्क चॉकलेट : संशोधनात असं दिसून आलं आहे की चॉकलेट केवळ तुमच्या हृदयासाठीच नव्हे तर त्वचेसाठीही चांगलं असतं. डार्क चॉकलेट हा त्वचेसाठी अनुकूल घटक आहे, ज्यामुळे तुमची त्वचा निरोगी, चमकदार ठेवण्यास मदत होते.
-
पालक: पालकामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि ई सारख्या अत्यंत उपयुक्त जीवनसत्त्वे असतात. ही भाजी त्वचेच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. कोरड्या त्वचेला लवकर आराम देते.
-
अंडी: अंड्यातील पिवळ्या बलकांमध्ये भरपूर जीवनसत्त्वं असतात. त्यात ‘बायोटिन’देखील असते, जे सौंदर्य जीवनसत्व म्हणून ओळखलं जातं.
-
ग्रीन टी : ग्रीन टी त्वचेसाठीही फायदेशीर आहे. ग्रीन टीमुळे तुमची त्वचा निरोगी बनते. तसेच यामुळे त्वचेतील विषारी घटक बाहेर काढण्यास आणि डाग बरे करण्यास मदत होते.
-
संत्रा: संत्र्याच्या सालीचे अनेक फायदे आहेत. त्वचा उजळ करण्यात आणि मुरुम कमी करण्यात संत्र्याची साल प्रभावी असल्यामुळे अनेक सौंदर्य उत्पादनांमध्ये याचा वापर केला जातो. या लिंबूवर्गीय फळांमध्ये असलेले व्हिटॅमिन सीमुळे आपली त्वचा चमकण्यास मदत होते.
-
टोमॅटो : जर तुम्ही टोमॅटो किंवा टोमॅटोपासून बनवलेल्या इतर पदार्थांचं भरपूर सेवन केलं तर तुमच्या त्वचेत लायकोपीनचे प्रमाण वाढेल. यामुळे तुमची त्वचा नैसर्गिकरित्या लहान बाळासारखी मऊ होईल. टोमॅटो तुमच्या त्वचेला ऑक्सिजन शोषण्यास सक्षम करतात. यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात. (सर्व फोटो सौजन्य-इंडियन एक्स्प्रेस/गुजराती)

Pahalgam Terror Attack : गोळीबार सुरू होताच झाडावर चढून केलं संपूर्ण हल्ल्याचं रेकॉर्डिंग; स्थानिक व्हिडीओग्राफर बनला NIAचा प्रमुख साक्षीदार