-
तुम्ही अनेकदा ऐकले किंवा वाचले असेल की, रात्रीचे जेवण उशिरा करू नये. रात्री लवकर जेवण करण्याचे अनेक फायदे आहेत. लवकर जेवल्यामुळे वजन नियंत्रण आणि पचनक्रिया सुरळीत राहते; पण त्याबरोबरच चांगली झोपसुद्धा येते, ज्यामुळे तुमची एनर्जी लेव्हल सुधारू शकते. (Photo – Freepik)
-
रात्री लवकर जेवण केल्यामुळे तुमची झोप कशी सुधारू शकते, याविषयी न्यूट्रिशनिस्ट राशी चौधरी सांगतात, “जेव्हा तुम्ही रात्रीचे जेवण लवकर करता, तेव्हा मेलाटोनिन हार्मोन रक्तप्रवाहात सोडायला पुरेसा वेळ मिळतो, ज्यामुळे शरीरातील एन्झाइम सुधारतात आणि तुम्हाला सकाळी उत्साही आणि ताजेतवाने वाटते. (Photo – Freepik)
-
रात्रीचे जेवण लवकर केल्यामुळे शरीराला झोपण्यापूर्वी अन्न पचण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. यामुळे अपचनासारख्या समस्या टाळता येतात. जर तुम्ही जेवल्यानंतर लगेच झोपत असाल तर पचनक्रिया बिघडू शकते, त्यामुळे रात्री लवकर जेवण करावे. (Photo – Freepik)
-
रात्रीचे जेवण लवकर केल्याने चांगली झोप येते. जेव्हा तुम्ही जेवण करता आणि लगेच झोप घेता त्यामुळे तुम्ही अन्न पचवू शकत नाही आणि अनेकदा झोपताना त्रास जाणवू शकतो; पण रात्रीचे जेवण लवकर केल्याने शांत झोप येऊ शकते. (Photo – Freepik)
-
जेवण लवकर केल्यामुळे वजन नियंत्रणात राहू शकते. अनेकदा उशिरा जेवल्यानंतर लगेच झोप येते, त्यामुळे पचनक्रिया सुरळीत होत नाही आणि वजन वाढू शकते. रात्रीचे जेवण लवकर केल्यामुळे रात्री उशिरा स्नॅक खाणे आपण टाळू शकतो, ज्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणे अधिक सोपे जाते. (Photo – Freepik)
-
रात्रीचे जेवण लवकर केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवता येते. जेव्हा तुम्ही लवकर जेवण करता तेव्हा अन्नपचन चांगल्याप्रकारे होते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते आणि शरीराचे मेटाबॉलिजम सुधारते. (Photo – Freepik)
-
जेव्हा तुम्ही रात्रीचे जेवण लवकर करता, तेव्हा तुमच्या शरीराला अन्न पचवण्यासाठी आणि पोषक तत्वे शरीरात शोषून घेण्यासाठी अधिक वेळ मिळतो. यामुळे शरीराला एनर्जी मिळते आणि व्यक्तीचा मूड सुधारतो. (Photo – Freepik)
-
वजन वाढ ही दिवसेंदिवस वाढत असलेली एक गंभीर समस्या आहे. वजन कमी करण्यासाठी सर्वात आधी आहारात बदल करणे गरजेचे आहे. कोणता आहार घ्यावा आणि आहार घेण्याची वेळ, या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. (Photo – Freepik)
-
मुंबईच्या नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ आणि न्यूट्रिशनिस्ट उषाकिरण सिसोदिया सांगतात, “रात्री लवकर जेवणाचे भरपूर फायदे आहेत. झोपण्याच्या दोन तासाआधी रात्रीचे जेवण करावे, यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते आणि इन्सुलिनच्या सेन्सिटिव्हिटीमुळे टाइप २ मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. याशिवाय शरीराला अन्न पचण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो आणि पचनक्रिया सुधारते. (Photo – Freepik)
प्रसिद्ध अभिनेत्रीने बिझनेसमनशी केला साखरपुडा, आजपासून लग्नाआधीच्या सेलिब्रेशनला सुरुवात, ‘या’ शहरात होणार लग्न