-
जर तुम्ही एखाद्या मुलाबरोबर किंवा मुलीबरोबर रिलेशनशिपमध्ये येण्याचा विचार करीत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. (Photo : Freepik)
-
हल्ली रिलेशनशिपमध्ये येणे, गर्लफ्रेंड वा बॉयफ्रेंड बनविणे, डेट करणे या खूप सामान्य बाबी झाल्या आहेत. त्यात यशस्वी झालेल्या व्यक्ती पुढे लग्नाचा विचार करतात. त्यालाच आपण ‘लव्ह मॅरेज’ म्हणतो. (Photo : Freepik)
-
आपण ‘लव्ह मॅरेज’ करण्यापूर्वी रिलेशनशिपमध्ये राहणे खूप गरजेचे आहे. (Photo : Freepik)
-
कोणत्या वयात रिलेशनशिपमध्ये यावे, हे तुम्हाला माहीत आहे का? आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत. (Photo : Freepik)
-
कोणत्याही व्यक्तीने रिलेशनशिपमध्ये येण्यासाठी घाई करू नये. त्यामुळे त्याच्या आणि पार्टनरच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतो. रिलेशनशिपमध्ये येण्यासाठी दोन्ही व्यक्ती खूप समजूतदार असणे खूप जास्त गरजेचे आहे. (Photo : Freepik)
-
रिलेशनशिपमध्ये येण्यासाठी योग्य वय हे २० नंतरचे आहे. वयाच्या विसाव्या वर्षानंतर चांगले-वाईट यातील फरक कळतो. व्यक्तीमध्ये समजूदारपणा दिसून येतो. एकमेकांना समजून घेणे, त्यांना सोपे होते. (Photo : Freepik)
-
वयाच्या विसाव्या वर्षानंतर व्यक्तीला त्याच्या आयुष्यातील ध्येयांविषयी माहिती असते. त्यामुळे नाते आणि करिअर यांच्यात समतोल राखणे, त्यांना खूप सोपे जाते. (Photo : Freepik)
-
वयाच्या १३ ते १९ या वयात चुकूनही रिलेशनशिपमध्ये येऊ नये. या वयात करिअरवर फोकस ठेवावा आणि चांगले भविष्य घडवण्यासाठी मेहनत करावी. (Photo : Freepik)
-
ज्या वयात अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता असते, त्या वयात रिलेशनशिपमध्ये आल्याने मुलांचा स्ट्रेस वाढू शकतो आणि अभ्यासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होऊ शकते. (Photo : Freepik)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”