-
आपण तव्यावर पोळ्या बनवतो; पण अनेकदा पोळ्या बनवल्यानंतर तवा काळा पडतो. (Photo : Pexels)
-
तव्याचा काळपटपणा दूर करण्यासाठी अनेक उपाय करूनही काहीही फायदा होत नाही. (Photo : Pexels)
-
आज आम्ही तुम्हाला दोन खास उपाय सांगणार आहोत. हे उपाय ट्राय करून तुम्ही तवा चांगला स्वच्छ करू शकता. चला तर जाणून घेऊ या काय आहेत ते उपाय? (Photo : Pexels)
-
पोळ्या भाजताना अनेकदा तव्यावर गव्हाचे पीठ पडते आणि ते जळते. त्यामुळे तवा काळा पडतो. (Photo : Pexels)
-
तव्याचा काळपटपणा कोणत्याही डिटर्जंटने स्वच्छ होत नाही; पण काही खास उपाय करून तुम्ही तवा एका मिनिटात नव्यासारखा चमकवू शकता. (Photo : Pexels)
-
तव्याचा काळपटपणा दूर करण्यासाठी तुम्ही लिंबू आणि मिठाचा वापर करू शकता. सुरुवातीला काळा पडलेला तवा गॅसवर कमी आचेवर ठेवावा आणि गरम तव्यावर पाणी टाकावे. (Photo : Pexels)
-
पाणी गरम झाल्यानंतर त्या पाण्यात एक चम्मच मीठ टाकावे. तवा कमी आचेवर ठेवावा आणि लिंबू मध्यभागी कापून, त्या लिंबूच्या तुकड्याने तवा चांगला घासावा. बघा तुमचा तवा काही क्षणांतच नव्यासारखा स्वच्छ दिसेल. (Photo : Pexels)
-
व्हिनेगरसुद्धा तवा स्वच्छ करण्यासाठी चांगले ऑप्शन आहे. त्यासाठी तवा थोडा गरम करावा. गरम तव्यावर लिंबू घासावे. (Photo : Pexels)
-
त्यानंतर तवा जास्त काळा पडलेल्या ठिकाणी व्हिनेगर व मीठ टाकावे आणि लिंबूने पुन्हा तवा घासावा. एका मिनिटामध्ये तवा चमकताना दिसेल. (Photo : freepik)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख