-
लग्नानंतर दोन व्यक्ती नव्या आयुष्याची सुरुवात करतात. या नव्या आयुष्यात नवी लोकं आणि नवी नाती निर्माण होतात. लग्नानंतर मुलींच्या आयुष्यात खूप बदल दिसून येतात. त्या सासरी जातात. सासरच्या लोकांमध्ये त्या रमायचा प्रयत्न करतात. (Photo : Freepik)
-
लग्नानंतर प्रत्येक मुलीला वाटतं की तिला एक चांगली सासू मिळावी. पण, अनेकदा वैचारिक मतभेद आणि गैरसमजामुळे अनेक मुलींचे त्यांच्या सासूबरोबर पटत नाही. (Photo : Freepik)
-
जर तुमच्या सासूबरोबर तुमचे मतभेद असतील तर टेन्शन घेऊ नका. काही ट्रिक्सच्या मदतीने तुम्ही सासूबरोबर सलोखा वाढवू शकता. आज आपण त्याविषयी जाणून घेऊ या. (Photo : Freepik)
-
कोणत्याही नात्यात मैत्री असेल तर नातं सर्वाधिक टिकतं. सासू सुनेचे नातेही असेच असते. या नात्यात जर प्रेम, काळजी, जिव्हाळा आणि मैत्री असेल तर नातं अधिक मजबूत होतं. मैत्रीमुळे सासू सुनेच्या नात्यात मतभेद निर्माण होत नाही आणि कोणतेही गैरसमज लवकर दूर होतात. (Photo : Freepik)
-
नातं कोणतंही असो, एकमेकांना समजून घ्यायला पाहिजे. नात्यात गैरसमज निर्माण होत असतील तर लगेच दूर करायला पाहिजे. सासू सुनेच्या नात्यात नेहमी संवाद असणे आवश्यक आहे. संवाद साधल्यामुळे अनेक गैरसमज दूर होऊ शकतात. (Photo : Freepik)
-
जर तुम्हाला सासूबरोबर तुमचं नातं अधिक घट्ट करायचे असेल तर तिच्याबरोबर वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा करा. (Photo : Freepik)
-
तिच्याबरोबर चांगल्या वाईट सर्व गोष्टी शेअर कराव्यात, ज्यामुळे तुम्हाला एकमेकांना समजून घेण्यास मदत होईल. (Photo : Freepik)
-
आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण अनेकदा समोरच्या व्यक्तीला गृहीत धरतो, त्यामुळे अनेकदा गैरसमज निर्माण होतात. (Photo : Freepik)
-
सासूला चुकूनही गृहीत धरू नका. तिचे महत्त्व समजून घ्या. तिचा आदर करा आणि तिला आई समजून प्रेम करा. (Photo : Freepik)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”