-
दही हा एक दुग्धजन्य पदार्थ असून भारतीय जेवणात याचा भरपूर उपयोग केला जातो. (Photo : Freepik)
-
रायते, कढी, कोशिंबीर, चटणी सारखे अनेक पदार्थ बनवण्यासाठी दह्याचा वापर केला जातो. (Photo : Freepik)
-
दही आरोग्यासाठीही तितकेच फायदेशीर आहे. दही पचायलाही तितकेच सुलभ असते. उपवासाला अनेक जण आवडीने दही खातात. (Photo : Freepik)
-
कधी कधी दही अचानक खूप आंबट होते अशावेळी आपण असे दही फेकून देतो पण असे चुकूनही करू नका. (Photo : Freepik)
-
फक्त एक घरगुती उपाय करुन तुम्ही आंबट दही खाण्यायोग्य बनवू शकता. चला तर सविस्तर जाणून घेऊ या. (Photo : Freepik)
-
आंबट विरजनाने बनविल्यास दही आंबट होते. याशिवाय फ्रिजमध्ये न ठेवता उष्णतेच्या ठिकाणी दही ठेवल्यास दही आंबट होऊ शकते. (Photo : Freepik)
-
बाहेर ठेवल्याने दह्यात बॅक्टेरीया वाढतात त्यामुळे दही आवश्यकतेपेक्षा जास्त आंबट होते. (Photo : Freepik)
-
यासाठी सुरुवातीला दह्यातील पाणी बाजूला काढावे. त्यानंतर या दह्यात थंड पाणी टाकावे आणि चम्मच हळूवारपणे दह्यातून फिरवावा. चाळणीने पाणी गाळून घ्यावे आणि वेगळे ठेवावे. (Photo : Freepik)
-
त्यानंतर दह्यात एक वाटी थंड दुध टाकावे. त्यानंतर दोन तीन तासांसाठी हे दही झाकून ठेवावे. (Photo : Freepik)

India beats Pakistan Video: पाकिस्तानी युवतीचा त्रागा; म्हणाली, “हरलात ते ठीक आहे, पण त्या कोहलीचं शतक…”!