-
कांद्याचा उपयोग हा जास्तीत जास्त रेसिपीमध्ये केला जातो. सहसा कांदा कापताना आपण कांद्याची साल टाकून देतो. पण तुम्हाला माहिती आहे का, कांद्याची साल किती उपयोगाची आहे. हो, हे खरंय. (Photo : Pexels)
-
कचरा समजल्या जाणाऱ्या कांद्याच्या सालीचे फायदे वाचाल तर तुम्हीसुद्धा थक्क व्हाल. आज आपण त्याविषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत. (Photo : Pexels)
-
सध्या धावपळीच्या आयुष्यात आपण आरोग्याकडे लक्ष देत नाही. शारीरिक हालचाल कमी असताना त्यात आपण जंक फूडचे सेवन करतो, त्यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. (Photo : Pexels)
-
पण तुम्हाला माहिती आहे का, कांद्याच्या सालीमुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होऊ शकतो. जर तुम्ही कांद्याच्या सालीचे पाणी उकळून प्यायले तर याचा फायदा तुम्हाला दिसून येईल. (Photo : Pexels)
-
अनेक जणांची रोगप्रतिकारकशक्ती खूप कमी असते. अशा लोकांना व्हायरल इन्फेक्शनचा धोका अधिक असतो. पण, रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी कांद्याची साल फायदेशीर आहे. (Photo : Pexels)
-
या सालीमध्ये व्हिटामिन सीची मात्रा भरपूर असते, ज्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढू शकते. ही कांद्याची साल पाण्यात उकळावी आणि हे पाणी गाळून प्यावे. (Photo : Pexels)
-
कांद्याच्या सालीमध्ये रेटिनॉल आणि व्हिटामिन ए ची मात्रा अधिक असते. हे पोषक तत्वे आपल्या डोळ्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. (Photo : Pexels)
-
कांद्याच्या सालीचा उपयोग करून तुम्ही डोळ्यांची दृष्टी वाढवू शकता. यासाठी पाण्यामध्ये कांद्याची साल उकळावी आणि हे कोमट पाणी गाळून प्यावे. (Photo : Pexels)
-
केसांच्या सौंदर्यासाठी केसांची निगा राखणे खूप गरजेचे आहे. कांद्याच्या सालीचा उपयोग करून तुम्ही केसांचे सौंदर्य वाढवू शकता.यासाठी एका भांड्यामध्ये पाणी घ्या आणि त्यात कांद्याची साल टाका. एका तासानंतर त्या पाण्याने केस धुवा. यामुळे केसांच्या समस्या दूर होऊ शकतात. (Photo : Pexels)

हवामान खात्याचा राज्याला इशारा, आजपासून ‘या’ नऊ जिल्ह्यात…