-
Winter Diet: गेल्या काही दिवसांपासून देशातील तापमान हळूहळू कमी होत आहे. पहाटेच्यावेळी थंड वाऱ्याची झुळूकही अनुभवता येते. ऑक्टोबरमध्ये उष्णता कमी होत असताना, आपल्या शरीराला थंडीसाठी तयार करावे लागेल.
-
असे म्हणतात की हिवाळ्यात भूक वाढते कारण शरीरात ऊर्जा निर्माण करण्यासाठी लागणारी उष्णता कमी होते, त्यामुळे शरीराला जास्त कॅलरीज बर्न कराव्या लागतात, परिणामी भूक वाढते.
-
ही भूक नियंत्रित ठेवण्यासाठी तुम्ही फक्त भाजलेले चणे आणि गूळ खाऊ शकता.गुळ आणि भाजलेले चणे खाण्याचे अनेक फायदे आहेत चला जाणून घेऊ या
-
चणे आणि गूळ एकत्र खाण्याचे फायदे
१) चणे आणि गूळ हे शरीरातील लोहाचा उत्तम स्रोत आहे. ज्या लोकांच्या शरीरात लोहाची कमतरता आहे त्यांनी याचे सेवन करावे.जर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तर अॅनिमिया सारख्या आजारांचा धोका टाळण्यासाठी भाजलेले आणि गूळ फायदेशीर ठरू शकतो. -
२) पचनाच्या समस्या असलेल्या लोकांना भाजलेल्या चण्यांमधून भरपूर प्रमाणात फायबर मिळतं जे पचनक्रियेला गती देण्यास मदत करते. तसेच या फायबरमुळे पोट भरलेले राहते आण पटकन भूक लागत नाही. जास्तीचे अन्न खाल्ले जात नाही.
-
३) गूळ आणि भाजलेले चणे व्हिटॅमिन बी ६ ने भरपूर असतात. हे दोन्ही घटक स्मरणशक्ती मजबूत करतात. तसेच मेंदूची कार्य क्षमता वाढते.
-
४) मूड रेग्युलेटिंग हार्मोन्स सेरोटोनिन आणि नॉरपेनेफ्रिन वाढवण्यास मदत करते. त्यामुळे शरीर आणि मनावरील ताण कमी होतो. त्यामुळे मूड खराब असेल तर गूळ खावा.
-
५) गूळ आणि भाजलेले चणे एकत्र खाल्ल्याने शरीराला भरपूर कॅल्शियम मिळते. त्यामुळे थंडीच्या वातावरणात हाडे मजबूत करण्यासाठी हे उत्तम अन्न आहे.
-
काही लोक आहार किंवा फिटनेस प्रवासाच्या नावाखाली तूप, गूळ सारखे पदार्थ टाळतात
-
पण याउलट हे पदार्थ हिवाळ्यात विशेषतः फायदेशीर ठरू शकतात हे विसरू नये. फक्त चणे नीट भाजले पाहिजेत किंवा पित्त किंवा अपचन होऊ शकते याची जाणीव ठेवा.

Highest Total in Champions Trophy: इंग्लंड संघाने घडवला इतिहास, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील उभारली सर्वात मोठी धावसंख्या