मुली आपल्या चेहऱ्यावर गुलाबी चमक आणण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करतात. अशा परिस्थितीत बाजारात विविध प्रकारची उत्पादने मिळतील पण त्यांचे दुष्परिणामही कमी नाहीत. (फोटो – freepik)
अशा परिस्थितीत नैसर्गिक आणि हर्बल उत्पादनांपासून बनवलेल्या सौंदर्य उत्पादनांचा वापर करण्याचा प्रयत्न केला जातो. (फोटो – freepik)
अनेकवेळा अचानक एखादा समारंभ किंवा पार्टी असेल तर काय करायचं असा प्रश्न बऱ्याच जणींना पडतो. अशा वेळी घरीच काय करता येईल असा तुम्ही विचार करत असाल तर मोगऱ्याचा फेसपॅक नक्की ट्राय करा. (फोटो – freepik)
तुम्ही केसात भरपूर मोगरा माळला असेल. पण या सुगंधित फुलाचा मोगऱ्याचा फेसपॅक कसा बनवायचा आणि चेहऱ्यावर लावण्याची पद्धत काय ते आज जाणून घ्या. (फोटो – freepik)
आपल्याला मोगऱ्याचा फेसपॅक बनवण्यासाठी मोगऱ्याची फुलं, कच्चं दूध आणि बेसन लागणार आहे. (फोटो – freepik)
आता हे बनवायचं कसं, तर सर्वात आधी मोगऱ्याची फुले घेऊन बारीक करा. एका भांड्यात घाला आणि त्यात एक चमचा कच्चे दूध आणि बेसन मिसळा. (फोटो – freepik)
जर पेस्ट घट्ट असेल तर आपण थोडे अधिक दूध घालू शकता. हा फेसपॅक तुम्हाला चेहऱ्यावर २० मिनिटे ग्लोसाठी ठेवावा लागेल. यानंतर ही पेस्ट चेहऱ्यावर लावून १० ते १५ मिनिटांनी थंड पाण्यानं धुवा. (फोटो – freepik)
मोगऱ्याला खूप छान सुगंध असतो. त्यामुळे सुगंधी उत्पादनांमध्ये मोगऱ्याचा भरपूर वापर केला जातो. (फोटो – freepik)
मोगऱ्याच्या फुलाची पेस्ट त्वचेवर लावल्यानं त्वचा नितळ आणि मऊ होते. विशेषत: थंडीमध्ये त्वचेसाठी हा फेसपॅक अधिक फायदेशीर आहे. (फोटो – freepik)