-
अनेक लोक ताकापेक्षा दही खाण्यास अधिक पसंती दर्शवतात. त्यामुळे तुलनेत दही सर्वाधिक लोकप्रिय आहे, असे म्हटले जाते. (फोटो – freepik)
-
पण, दही आणि ताक दोन्ही गोष्टी सारख्याच प्रक्रियेने बनवल्या जातात. अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो की, दह्याचे सेवन करावे की ताकाचे. (फोटो – freepik)
-
तेव्हा चला तर मग जाणून घेऊ की, दही आणि ताकाचे आपल्याला नक्की कोणते फायदे होतात? (फोटो – freepik)
-
तज्ञ सांगतात की,ताक हलके असते; तर दही जड असते. ताकाचा वापर आपण वजन कमी करण्यासाठी करू शकतो; तर दही आपले वजन वाढवू शकते. (फोटो – freepik)
-
त्यामुळे जर का तुमच्या शरीरात उष्णतेची कमतरता असेल, तर तुम्ही ताकापेक्षा दही घ्यावे आणि जर का तुमच्या शरीरात उष्णता जास्त असेल, तर तुम्ही ती कमी करण्यासाठी ताक पिऊ शकता. (फोटो – freepik)
-
ताक हे सर्व ऋतूंमध्ये शरीरासाठी चांगले असते. “ते दह्यापेक्षा खूप आरोग्यदायी आहे”, असंही त्या सांगतात. (फोटो – freepik)
-
याचा अर्थ असा होतो की, तुम्हाला जर का वजन कमी करायचे असेल, तर तुम्ही ताक पिऊ शकता; अन्यथा दही तुमच्यासाठी योग्य आहे. येथे तुम्ही वैद्यकीय सल्ला घेणे योग्य ठरेल. (फोटो – freepik)
-
लठ्ठपणा, कफ विकार, रक्तस्राव विकार, दाहक विकार, जडपणा वाढणे, सांधेदुखी अशा व्यक्तींनी दही टाळावे. (फोटो – freepik)
-
वजन कमी करण्यासाठी : जर तुमची पचनक्रिया चांगली असेल, तर दही खाल्ल्याने वजन वाढण्यास मदत होते. वजन कमी करायचे असेल, तर ताक सेवन करा आणि दह्यापासून दूर राहा. (फोटो – freepik)
“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल