-
चालणे ही आपल्या दैनंदिन आयुष्यातील सर्वात महत्त्वाची क्रिया आहे. प्रत्येकाची चालण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. काही लोक खूप वेगाने चालतात, तर काही खूप हळूवारपणे चालतात. (Photo : Freepik)
-
तुम्हाला माहिती आहे का, चालण्याच्या शैलीवरून व्यक्तीचा स्वभाव ओळखता येतो. तुमची चालण्याची शैली तुमच्या व्यक्तिमत्त्वाविषयी काय सांगते, या विषयी आज आपण जाणून घेणार आहोत. (Photo : Freepik)
-
खूप वेगाने चालणारे लोकं खूप मेहनती असतात. ते अतिशय कर्तव्यनिष्ठ असतात. यांना नवनवीन आव्हानं स्वीकारायला आवडतात. (Photo : Freepik)
-
खूप वेगाने चालणारे लोकं कधीही कोणत्याही गोष्टीचा अति जास्त विचार करत नाही. ते कोणत्याही परिस्थितीचा सामना हसतमुखाने करतात. (Photo : Freepik)
-
काही लोकांना खूप हळू चालायची सवय असते. अशा लोकांना जास्त बोलायला आवडत नाही. ते नेहमी स्वत:चा विचार करतात. त्यांना आरामदायी जीवन जगायला आवडते. (Photo : Freepik)
-
हळू चालणारे लोक नेहमी निवांत असतात. अशी चाल असणाऱ्या व्यक्ती नेहमी आपल्या मनाप्रमाणे वागतात. यांचा स्वभाव खूप शांत असतो. (Photo : Freepik)
-
काही लोक सवयीनुसार चालताना मोठी पावले टाकतात. अशा व्यक्ती नेहमी सकारात्मक विचार करतात. त्यांचे व्यक्तिमत्त्व खूप आक्रमक असते. (Photo : Freepik)
-
मोठी पावले टाकणारी लोकं अतिशय बुद्धिमान असतात. अष्टपैलू व्यक्तिमत्त्वामुळे समाजात या लोकांचे खूप कौतुक होते. (Photo : Freepik)
-
काही लोकांना पाय घासून चालण्याची सवय असते. असे लोक नेहमी टेन्शनमध्ये असतात. हे लोक नेहमी निराश आणि उदास दिसतात. या लोकांमध्ये कोणतेही नवीन काम करण्याचा उत्साह नसतो. (Photo : Freepik)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”