-
कुत्रा चावण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही महिन्यांपासून कुत्रा चावण्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. आपल्याला माहिती आहे की कुत्रा चावल्यामुळे रेबीज हा आजार होतो. या आजाराचे अनेक लोक शिकार होताना दिसतात. हा आजार जीवघेणा असून यावर त्वरित उपचार करणे तितकेच गरजेचे आहे. (Photo : Freepik)
-
कुत्रा चावल्यानंतर तातडीने काय करावं किंवा प्राथमिक उपचार कोणते करावेत, याविषयी अकोला येथील ‘पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ व्हेटरनरी अँड ॲनिमल सायन्स’चे सहअधिष्ठाता डॉ. धनंजय दिघे यांनी सविस्तर माहिती दिली. (Photo : Freepik)
-
डॉ. धनंजय दिघे सांगतात, “कुत्रा चावल्यानंतर सुरुवातीला तुमच्या घरी असलेल्या साबणाने जर जखम धुतली तर रेबीजचा व्हायरस लवकर नष्ट होतो. यासाठी लाइफबॉय साबण अधिक प्रभावशाली आहे. त्यानंतर ड्रेसिंग करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. कुत्रा चावल्यानंतर तातडीने देण्यात येणारी अँटी सीरमसुद्धा उपलब्ध आहे.” (Photo : Freepik)
-
“रेबीजच्या व्हायरसपासून बनवण्यात आलेली अँटी सीरम तुम्हाला कोणत्याही केमिस्टच्या दुकानात मिळू शकते. हे सीरम डॉक्टर तुमच्या जखमेच्या आजूबाजूला टोचतात. हा उपचार तातडीने करणे गरजेचे आहे. एक किंवा दोन दिवसांनी करेन, असे म्हणून चालणार नाही. ज्या दिवशी कुत्रा चावला आहे त्या दिवशीच सीरम टोचणे आवश्यक आहे. कुत्रा चावल्यानंतर लगेच १५-२० मिनिटांमध्ये हे सीरम टोचले तर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो.” (Photo : Freepik)
-
डॉ. दिघे सांगतात, “कुत्रा चावल्यानंतर अँटी रेबीज कोर्स घेणेही आवश्यक आहे. पूर्वी पोटामध्ये इंजेक्शन घ्यावी लागायची, पण आता पोटामध्ये इंजेक्शन घ्यावी लागत नाही. आता हातामध्ये किंवा दंडामध्ये इंजेक्शन घेऊ शकतो. यासाठी सहा इंन्जेक्शनचा कोर्स आपल्याला पूर्ण करावा लागतो. हे सर्व उपचार केल्यामुळे कुत्र्याच्या व्हायरसपासून होणारा रेबीज रोग आपल्याला टाळता येतो.” (Photo : Freepik)
-
डॉ. दिघे पुढे सांगतात, “कुत्रा चावल्यानंतर अनेकदा रक्तस्त्राव होऊ शकतो. कुत्र्याने चावा घेतल्यानंतर रक्त वाहिनीला दुखापत झाली तर रक्तस्त्राव होण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी रक्तस्त्राव थांबवण्यासाठी जखमेवर पट्टी किंवा बँडेज बांधणे गरजेचे आहे. अँटी सीरम ९० टक्के फायदेशीर ठरते. या सीरममुळे कुत्र्याच्या लाळेतून जो व्हायरस निर्माण होतो, तो व्हायरसच नष्ट होतो.” (Photo : Freepik)
-
डॉ. दिघे सांगतात, “कुत्रा चावल्यानंतर त्याच्या लाळेतून जो व्हायरस निर्माण होतो, त्या व्हायरसमुळे रेबीज हा आजार रक्तामध्ये पसरतो. त्यामुळे उपचाराचा कालावधी म्हणता येणार नाही. जितक्या लवकर उपचार घेता येईल तितके चांगले आहे. कुत्रा चावल्यानंतर दुर्लक्ष करू नये. लवकरात लवकर डॉक्टरांकडे जाऊन इंजेक्शनचा कोर्स सुरू करणे आवश्यक आहे. व्हायरस पसरू नये म्हणून कुत्रा चावल्यानंतर एक ते दोन तासात उपचार घेणे गरजेचे आहे.” (Photo : Freepik)
-
डॉ. दिघे म्हणतात, “लहान मुलांना या गोष्टीचे महत्त्व कळत नाही. खेळता खेळता एखादा कुत्रा चावून जातो. मुलांसह पालकांनाही याबाबत कल्पना नसते. त्यामुळे याकडे दुर्लक्ष केलं जातं. अनेकदा गरीब लोकं डॉक्टरांकडे जाणे टाळतात. पाण्याने जखम धुवून ठेवतात, हळद लावतात किंवा घरगुती उपचार केले जातात. पालक, शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत ही जनजागृती करणे गरजेचे आहे. कुत्रा चावणे ही साधी गोष्ट नाही. पाळीव असो किंवा रस्त्यावरचा असो, कुत्रा रेबीजचा वाहक आहे. (Photo : Freepik)
-
पाळीव कुत्रासुद्धा पिसाळू शकतो, याची आपल्याला कल्पना नसते. जेव्हा पाळीव कुत्रा चावतो, तेव्हा कुत्र्याच्या मालकाला सुरुवातीला विश्वास बसत नाही. पण, मालकाला अनेकदा कल्पना नसते की, पाळीव कुत्र्यालासुद्धा दुसरा रस्त्यावरचा कुत्रा चावलेला असतो. अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. पाळीव कुत्रा अचानक चावायला लागतो, हे त्यामागील कारण असू शकते. कोणताही कुत्रा चावला तरी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेतले पाहिजे.” (Photo : Freepik)
१९ वर्षीय भाचा मामीला घेऊन पळाला, संतापलेल्या मामाने मोठ्या बहिणीला संपवलं