-
हवामानात बदल होण्यापूर्वी प्रदूषणात वाढ झाली आहे. फटाक्यांमधून निघणाऱ्या धुराचा थेट फुप्फुसांवर परिणाम होतो. (फोटो – Freepik)
-
त्यामुळेच आजकाल बहुतेक लोकांना धाप लागणे, खोकला, श्वासनलिकेतील अस्वस्थता यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते.(फोटो – Freepik)
-
तुम्हीही श्वासोच्छवासाच्या आजाराने किंवा अस्थम्यासारख्या आजाराने ग्रस्त असाल, तर तुमच्या फुप्फुसांचे संरक्षण करणे तुमच्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे.(फोटो – Freepik)
-
हिवाळा आला की, धुक्यासोबतच प्रदूषणाची पातळीही वाढते. याच प्रदुषणापासून स्वत:चं संरक्षण करण्यासाठी तुम्ही घरामध्येही फुप्फुसांचे आरोग्य सुधारू शकता. आरोग्य तज्ज्ञ डॉ. मिकी मेहता यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.(फोटो – Freepik)
-
व्यायाम जसे की, स्पॉट जॉगिंग किंवा घरातच सायकलिंग केल्याने तुमच्या हृदयाची आणि फुप्फुसांची स्थिती सुधारू शकते. तसेच स्नायूंची ताकद, फिटनेस वाढू शकतो. (फोटो – Freepik)
-
व्यायाम हा फुप्फुसांत साचलेली घाण काढून टाकण्याचा हा एक उत्तम उपाय आहे.(फोटो – Freepik)
-
हृदय आणि फुप्फुसांच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी योगा हा उत्कृष्ट उपाय आहे. सध्या हवा प्रदूषित झाल्यामुळे अनेकांना फुप्फुसांच्या समस्या निर्माण होतात.(फोटो – Freepik)
-
सूर्यनमस्कार हा एक संपूर्ण व्यायाम आहे. त्यामध्ये पायाच्या बोटांपासून डोक्यापर्यंत प्रत्येक अवयवाला फायदा मिळतो.(फोटो – Freepik)
-
सर्वसामान्य व्यक्तीही श्वास रोखून धरण्याचा व्यायाम करू शकते. यामुळे फुफ्फुसे सुदृढ ठेवण्यास मदत होईल.(फोटो – Freepik)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल