-
ब्रेड पकोडा किंवा बेसनाचे धिरडे आपल्यापैकी अनेकांना आवडत असेल. हे दोन्ही पदार्थ बेसनापासून बनवले जातात. पण, या दोन्ही पदार्थांतील पोषक घटकांमध्ये खूप फरक दिसून येतो. त्यापैकी कोणता पदार्थ खाणे चांगले आहे? याविषयी आज आपण तज्ज्ञांकडून जाणून घेऊ या. (Photo : Instagram/Social media)
-
लाइफस्टाईल, व्यायाम आणि न्यूट्रिशन कोच सुविधा जैन सांगतात, “ब्रेड पकोडा हा तळलेला असतो. त्यामुळे त्यात कॅलरी, सॅच्युरेटेड व ट्रान्स फॅट्स जास्त असतात. (Photo : Instagram/Social media)
-
“बेसनाचे धिरडे हे भरपूर भाजी आणि पनीरपासून अगदी कमी तेलाचा वापर करून बनवले जाते. त्यामुळे धिरडे हा एक चांगला पौष्टिक पदार्थ असू शकतो.” (Photo : Instagram/Social media)
-
जैन पुढे सांगतात, “याशिवाय बेसनाचे धिरडे जर तुम्ही चटणीबरोबर खात असाल, तर जिभेची चवही वाढते. जर तुम्हाला ब्रेड पकोडा हेल्दी बनवायचा असेल, तर तुम्ही स्प्रे तेलाच्या मदतीने पकोडा तळू शकता आणि नंतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांद्वारे एअर फ्राय करू शकता. त्यामुळे तुमचा ब्रेड पकोडा कुरकुरीत होईल आणि त्यातील कॅलरीजसुद्धा कमी होऊ शकतात. असे ब्रेड पकोडे तुम्ही खाऊ शकता; पण ते वारंवार खाणे टाळावे.” (Photo : Instagram/Social media)
-
जैन सांगतात, “प्रोटिनयुक्त आहार घ्यावा आणि आहारात जास्तीत जास्त भाजीपाल्याचा समावेश करावा. आपले आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे.” (Photo : Instagram/Social media)
-
“जर तुम्ही आहार आणि व्यायाम ८० टक्के करीत असाल, तर २० टक्के मागे-पुढे झाले तरी काही हरकत नाही; पण त्यासाठी तुम्ही संतुलित आहार घेणे खूप आवश्यक आहे. (Photo : Freepik)
-
गुरुग्राम येथील नारायण सुपरस्पेशॅलिस्ट हॉस्पिटच्या आहारतज्ज्ञ मोहिनी डोंगरे सांगतात, “संतुलित आणि चांगला आहार घेण्यावर भर द्या. त्यामुळे तुम्ही तुमच्या शरीराची चांगली काळजी घेऊ शकता आणि तुमचे वजनसुद्धा नियंत्रित राहील; ज्यामुळे सुदृढ आरोग्य ठेवण्यास तुम्हाला मदत होईल.” (Photo : Freepik)
-
मोहिनी डोंगरे यांनी बेसनाचे धिरडे कसे बनवायचे, याविषयी सांगितले. त्या सांगतात, “बेसनाचे धिरडे बनवताना मिश्रण चांगले बनवा. बेसन आणि पाणी चांगले एकत्र करा. त्यात भाज्या घाला आणि नॉन स्टिक तव्यावर कमीत कमी तेलाचा वापर करून धिरडे भाजा” (Photo : Instagram/Social media)
-
डोंगरे पुढे सांगतात, “बेसनाचे धिरडे हे खायला अतिशय स्वादिष्ट आणि कमी कॅलरीयुक्त असतात. त्यामुळे दिवसभर भरपूर ऊर्जा मिळते आणि पचायला ते हलके असतात. त्याचबरोबर काकडी किंवा पुदिन्याची चटणी खा. त्यामुळे आपल्याला अधिक पोषक घटक मिळू शकतात.” (Photo : Instagram/Social media)
प्रसिद्ध अभिनेत्रीने बिझनेसमनशी केला साखरपुडा, आजपासून लग्नाआधीच्या सेलिब्रेशनला सुरुवात, ‘या’ शहरात होणार लग्न