-
केस गळणे ही खूप मोठी समस्या आहे. अनेक जण केसगळतीच्या समस्येमुळे त्रासलेले दिसून येतात. केसगळतीची अनेक कारणे असू शकतात.
-
तुम्हाला माहीत आहे का की, धूम्रपानामुळेही केस गळू शकतात. डर्मेटोलॉजिस्ट डॉ. किरण नाबर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना धूम्रपानाचा केसांवर कसा दुष्परिणाम होतो, याविषयी सविस्तरपणे सांगितले आहे.
-
डॉ. सांगतात, “धूम्रपानामुळे केस गळतात. धूम्रपानामध्ये निकोटीन असते आणि धूम्रपानानंतर कार्बन मोनॉक्साइड बाहेर पडतो; ज्याचा केस आणि हेअर फॉलिकलच्या पेशींवरही दुष्परिणाम होतो. त्यामुळे केस गळतात.”
-
धूम्रपानामुळे आपल्या शरीरातील इस्ट्रोजन पातळी कमी होते. परिणामत: केसांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या इस्ट्रोजनची कमतरता निर्माण झाल्यामुळे केस गळतात.
-
धुम्रपानाचे केसांवर होणारे अन्य परिणाम – डॉक्टर सांगतात, धूम्रपानामुळे केस गळण्याशिवाय केस पांढरे होऊ शकतात.
-
हल्ली महिलांमध्येही धूम्रपानाचे प्रमाण वाढलेलं आहे. अशात धूम्रपानाचा महिला किंवा पुरुष यांच्यावर समान दुष्परिणाम दिसून येतो.
-
जे लोक दिवसातून १०-१५ वेळा सिगारेट ओढतात आणि दीर्घकाळ व्यसन करतात, त्यांना या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. त्याशिवाय धूम्रपान करणारे लोक वयाच्या तुलनेत लवकर वृद्ध दिसू लागतात.
-
धूम्रपान जर दीर्घकाळ सुरू असेल, तर केसांप्रमाणेच त्वचेवरही दुष्परिणाम दिसून येतो. त्याशिवाय हृदयाशी संबंधित आजार, तसेच फुप्फुसाच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो, असंही नाबर यांनी सांगितलं.
-
आनुवंशिकतेमुळे केस गळत असतील, तर तुम्हाला दीर्घकाळ उपचार घ्यावे लागू शकतात. यासाठी तुम्ही हेल्दी लाइफस्टाईल स्वीकारणे खूप आवश्यक आहे. धूम्रपान करणे टाळा, चांगली झोप आणि चांगला आहार यामुळे केसगळती थांबू शकते. असंही डॉ. नाबर यांनी सांगितलं.

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल