-
हिवाळा हा पेरूचा हंगाम म्हणून ओळखला जातो. हिवाळ्यात लोकं मोठ्या आवडीने पेरू खातात. (Photo : Freepik)
-
पेरू आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असून त्यातून अनेक पोषक घटक आपल्याला मिळतात. (Photo : Freepik)
-
जर तुम्ही सध्या पेरूचा आस्वाद घेत असाल तर त्याआधी पेरूचे फायदे जाणून घ्या. (Photo : Freepik)
-
पेरू वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. एका लहान पेरूमध्ये भरपूर प्रमाणात प्रमाणात फायबर आणि मिनरल्स आणि फक्त ३० ते ६० कॅलरीज असतात. त्यामुळे ज्यांना सतत भूक लागते त्यांच्यासाठी पेरू हा चांगला पर्याय आहे. (Photo : Freepik)
-
जर तुम्ही मासिक पाळीदरम्यान पेरू खात असाल तर तुम्हाला होणाऱ्या वेदना दूर होऊ शकतात.त्यामुळे मासिक पाळीदरम्यान पेरू नियमित खावेत. (Photo : Freepik)
-
पेरूमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात. यामुळे तुमच्या शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण कमी होते ज्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही आणि नियंत्रणात राहते. (Photo : Pexels)
-
पेरूमध्ये अँटीऑक्सिडंट्स, पोटॅशियम, आणि फायबर असतात यामुले आपल्या शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात ज्यामुळे आपले ह्रदयाचे आरोग्य सदृढ राहते आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो. (Photo : Pexels)
-
जर तुम्ही भरपूर पेरू खात असाल तर तुमचे आतड्यांचे आरोग्य चांगले राहते ज्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. (Photo : Pexels)
-
पेरू खाताना चुकूनही पेरूचे पेय पिऊ नये. खूप जास्त प्रक्रिया करून पेरूचे पेय बनवले जाते आणि यामध्ये खूप जास्त साखरेचे प्रमाण असते जे आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही. (Photo : Pexels)

महामार्ग वाहतूक कोंडीमुक्तीच्या दिशेने पहिले पाऊल; संयुक्त कारवाईमध्ये महामार्गालगतची २०१ अतिक्रमणे हटविली