-
कारल्याच्या बिया त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. त्यातील जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स आणि खनिजे त्वचेला निरोगी ठेवण्यास मदत करतात. (फोटो : Freepik)
-
कारल्याच्या बियांचा फेस पॅक त्वचेला फायदेशीर आहे. कारल्याची भाजी केवळ आरोग्यासाठीच नाही, तर चेहऱ्यासाठीही तितकीच फायदेशीर आहे. (फोटो : Freepik)
-
कारल्याच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी आणि खनिजे आढळतात. चला तर मग जाणून घेऊ कारल्याच्या बियांचा फेस पॅक कसा बनवायचा ते. (फोटो : Freepik)
-
कारल्याच्या बियांचा फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम कारल्याच्या बिया चांगल्या प्रकारे धुऊन घ्या. त्या मिक्सरमध्ये किंवा अन्य प्रकारे बारीक करा.(फोटो : Freepik)
-
आता त्यात मध आणि दही घालून मिक्स करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि १५-२० मिनिटे राहू द्या.(फोटो : Freepik)
-
त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.आठवड्यातून २-३ वेळा असे केल्याने त्वचा मुलायम आणि चमकदार दिसेल.(फोटो : Freepik)
-
तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हा पॅक स्टोअर करू शकता. हा पॅक एक आठवड्यासाठी फ्रिजमध्ये ठेवता येतो.(फोटो : Freepik)
-
कारल्याच्या बियांपासून बनवलेला फेस पॅक तुमची त्वचा खोलवर स्वच्छ करील.(फोटो : Freepik)
