-
स्ट्रोक म्हणजे लकवा किंवा अटॅक मेंदूपर्यंत रक्त पुरवणारी धमनी जेव्हा फाटते तेव्हा व्यक्तीला अचानक स्ट्रोक येऊ शकतो. स्ट्रोक हा प्रामुख्याने वृद्ध लोकांमध्ये आढळून यायचा, पण गेल्या काही दशकांपासून तरुण-प्रौढ मंडळींमध्ये याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. (Photo : Freepik)
-
एका अभ्यासानुसार ४५ किंवा त्यापेक्षा वयाने कमी असलेल्या लोकांमध्ये स्ट्रोक येण्याचे प्रमाण १० ते १४ टक्क्याने वाढले आहे; हे अत्यंत धोकादायक आहे. याविषयी बंगळुरू येथील मणिपाल हॉस्पिटलच्या न्यूरोलॉजीचे मुख्य व वरिष्ठ सल्लागार डॉ. शिव कुमार आर यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सविस्तर माहिती सांगितली. (Photo: Freepik)
-
डॉ. शिव कुमार आर सांगतात, “आपण अनेकदा स्ट्रोक येण्यामागे ठराविक गोष्टी कारणीभूत असल्याचे मानतो. ५० टक्के प्रकरणांमध्ये लठ्ठपणा, मधुमेह, धूम्रपान किंवा मद्यपान इत्यादी कारणे दिसून आली आहेत; पण तणाव, मायग्रेन, मादक पदार्थांचे सेवन, निद्रानाश किंवा नैराश्य यांसारख्या गोष्टींकडे आपण सहसा दुर्लक्ष करतो, पण यामुळेसुद्धा ४० ते ५० टक्के प्रकरणांमध्ये स्ट्रोक येण्याचा धोका असतो. याशिवाय आता प्रदूषण हे सुद्धा स्ट्रोक येण्यामागील नवीन कारण समोर आले आहे.” (Photo: Freepik)
-
शरीरात हार्मोन्स निर्माण करताना तणाव वाढतो. या तणावामुळे शरीरातील न्यूरोएंडोक्राइन फंक्शन्स (neuroendocrine functions) मध्ये अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे स्ट्रोक येऊ शकतो. (Photo: Freepik)
-
तणावामुळे रक्तवाहिन्यांवरील पेशी लेअर फाटतात, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये कॅल्शियम साठवणे कठीण होते. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे स्ट्रोक येऊ शकतो. (Photo: Freepik)
-
तणावामुळे प्लेटलेट्स एकत्र येतात, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या निर्माण होतात. रक्तपुरवठा नीट होत नाही आणि स्ट्रोक येण्याचा धोका वाढतो.
प्रदूषित हवेमध्ये विषाणू सूक्ष्म कण, कार्बन मोनॉक्साइड, सल्फर डाय ऑक्साइड आणि नायट्रोजन डाय ऑक्साइड असते. (Photo: Freepik) -
जेव्हा आपण या खराब हवेत श्वास घेतो, तेव्हा हवेतील बारीक कण आपल्या फुफ्फुसांमध्ये शिरतात; ज्यामुळे फुफ्फुसांवर सूज येऊ शकते आणि हे कण आपल्या शरीरात पसरले तर आपल्या हृदय आणि रक्तवाहिन्यांवर त्यांचा विपरीत परिणाम होऊ शकतो. (Photo: Freepik)
-
प्रदूषित हवेत अत्यंत सूक्ष्म विषाणू कण असतात. ते फुफ्फुसात शिरले तर त्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होऊ शकतो आणि मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांवर त्याचा परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो. (Photo: Freepik)
-
प्रदूषित हवेतील सूक्ष्म कणांमुळे आपल्याला श्वास घेण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो, याशिवाय फुफ्फुसामध्ये जळजळ निर्माण होऊ शकते. हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या कार्यात अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे ॲट्रियल फायब्रिलेशन दिसून येते. ॲट्रियल फायब्रिलेशन म्हणजे अचानक हृदयाचे ठोके वाढतात, ज्यामुळे स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. (Photo: Freepik)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”