-
सफरचंद म्हणलं की काश्मिरी लाल , गोड खरपूस चवीचं फळ आपल्या डोळ्यासमोर येतं. आयुर्वेदात या फळाचे अनेक आरोग्य फायदे सांगण्यात आले आहे.
-
सकाळच्या नाश्त्याला सफरचंद खाल्ल्यास कोणकोणते फायदे मिळू शकतात, जाणून घ्या.
-
सफरचंदामध्ये तंतूमय पदार्थ मुबलक प्रमाणात आढळतात त्यामुळे ज्यांना आतड्याचे विकार आहे पचनाचे विकार आहेत त्यांच्यासाठी सफरचंद गुणकारी आहे. मात्र सफरचंदामध्ये असणाऱ्या सॉर्बिटॉल साखरेमुळे काही लोकांना गॅसेसचा त्रास होऊ शकतो.
-
सफरचंदामधील आणखी एक महत्वाचे पोषणमूल्य म्हणजे त्यातील हरितके (फायटोकेमिकल्स) क्वारसेटिन, कॅटचिन, क्लोरोजनिक आम्ल, अँथोसायनिन! या फ्लॅव्होनॉइड्समुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. पेशींचे आरोग्य सुधारते . विविध प्रकारचे कॅन्सर आणि आतड्याच्या विकारांपासून दार राहण्यासाठी हे पोषणमूल्य मदत करतात.
-
शरीराला आवश्यक ऊर्जा पुरविणे, माफक शर्करेचा परिणाम शरीरावर करणे यासारख्या गुणांमुळे सफरचंद गुणकारी फळांमधील महत्वाचे फळ आहे.
-
दाताचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी सफरचंद उपयुक्त फळ आहे.
-
मधुमेहाचं प्रमाण कमी करण्यासाठी किंवा मधुमेह रोखण्यासाठी सफरचंद अत्यंत गुणकारी आहे.
-
अनावश्यक कोलेस्ट्रॉल टाळण्यासाठी क्वारसेटिन अत्यंत उपयुक्त असते. सफरचंदामधील क्वारसेटिनचे मुबलक प्रमाण कोलेस्ट्रॉलच्या आरोग्यदायी प्रमाणाला कारणीभूत ठरू शकते.
-
सफरचंदापासून तयार केले जाणारे अॅपल सायडर व्हिनेगर पोटाच्या विकारांसाठी अत्यंत उपयुक्त असते.
-
मुतखड्याचा त्रास होताना यकृत अनेकदा कोलेस्ट्रॉल सोबत मुतखड्याचे प्रमाण वाढवते. अशावेळी आहारातील तंतुमय पदार्थ वाढविण्याचा सल्ला दिला जातो . मात्र सफरचंदाच्या नियमित सेवनाने हा त्रास होणे टाळले जाऊ शकते.
-
सफरचंद भूक शमविणारे, समग्रतेने संतुलन राखणारे आणि शरीरातील रक्तस्त्राव नियंत्रित करणारे फळ आहे. यातील पोटॅशिअम रक्तप्रवाह आणि रक्तदाब दोघांसाठी अत्यावश्यक आणि उपयुक्त आहे.
-
अनेक शोधाअंती असे आढळून आले आहे की नियमित सफरचंदाचे सेवन करणाऱ्या वृद्धांमध्ये पार्किन्सन्स, स्मृतिभ्रंश यासारखे आजार होत नाहीत.
-
अनेकजण सफरचंदाच्या स्वच्छतेसाठी त्याचे साल काढून टाकतात. मात्र या सालीत तंतुमय पदार्थ सर्वाधिक असतात. त्यामुळे सफरचंद स्वच्छ धुवून घेणे ही उत्तम प्रक्रिया आहे. (सर्व फोटो : फ्रीपिक)

‘या तीन राशी कमावणार अपार पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा; शनीदेवाचा गुरूच्या राशीतील उदय करणार मालामाल