-
बाजरीची भाकरी अनेकांना आवडते. लहानांपासून वृद्धापर्यंत अनेक जण आवडीने बाजरीची भाकरी खातात. बाजरीची भाकरी चवीला स्वादिष्ट आणि रुचकर असते. (Photo : Instagram)
-
यात भरपूर प्रमाणात पौष्टिक घटक आढळतात जे आरोग्यास गुणकारी असतात. पण तुम्हाला माहिती आहे का बाजरीची भाकरी हिवाळ्यात खाणे, अधिक फायदेशीर आहे. (Photo : Instagram)
-
आज आपण या विषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत. न्युट्रिशनिस्ट जुही कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी हिवाळ्यात बाजरी का खावी, याविषयी सांगितले आहेत. (Photo : Instagram)
-
बाजरीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, फायबर आणि इतर पौष्टिक घटक असतात जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. (Photo : Instagram)
-
मॅग्नेशियम रक्तदाब कमी करण्यासाठी ओळखला जातो. यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो. (Photo : Instagram)
-
बाजरी खाल्यानंतर लगेच पोट भरतं त्यामुळे अति जेवण करणे टाळतो आणि वजन नियंत्रण ठेवण्यास मदत होते. (Photo : Instagram)
-
यात फायबरचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे बाजरी मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप चांगला पर्याय आहे. यामुळे शरीरातील ग्लुकोजची पातळी वाढत नाही. (Photo : Instagram)
-
बाजरी पचायला सोपी असते त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते.ग्लुटेनची अॅलर्जी असणाऱ्या लोकांनी आहारात बाजरीचा समावेश करावा. (Photo : Instagram)
-
महाराष्ट्रातील सर्वोत्तम आहार म्हणजे तिळ घालून केलेली बाजरी. ही आरोग्यादायी आणि पोषक घटकांनी परिपूर्ण असते पण याबरोबरच यात फायबर आणि कॅलरीचे प्रमाण सुद्धा कमी असतात. (Photo : Instagram)
प्रसिद्ध अभिनेत्रीने बिझनेसमनशी केला साखरपुडा, आजपासून लग्नाआधीच्या सेलिब्रेशनला सुरुवात, ‘या’ शहरात होणार लग्न