-
तर या थंडीच्या दिवसात फॅशनेबल राहण्यासाठी तुम्ही काही खास जॅकेटचा वापर करू शकता. (फोटो:इन्स्टाग्राम/@kritisanon/dianapenty)
-
१.पफर जॅकेट : थंडीमध्ये सर्वात ट्रेंडी असे हे पफर जॅकेट आरामदायक आणि उबदार आहे. कडाक्याची थंडी असेल तेव्हा तुम्ही या जॅकेटचा उपयोग करू शकता. या जॅकेटचे गडद रंग नेहमीच आकर्षित करतात. लहानपणी हे जॅकेट घालायचा कंटाळा यायचा. पण, आता हे जॅकेटघालणं जणू एक ट्रेंड झाला आहे. (फोटो:इन्स्टाग्राम/@kritisanon)
-
४. डेनिम जॅकेट : डेनिम जॅकेट ही आधीपासून चालत आलेली फॅशन आहे. पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या प्लेन टी-शर्टवर तुम्ही हे डेनिम जॅकेट घालून पार्टी लूक करू शकता . ऑफिसपासून ते एखाद्या पिकनिक पर्यंत कोणत्याही प्रकाराच्या कपड्यांवर तुम्ही हे जॅकेट सहज परिधान करू शकता. (फोटो:इन्स्टाग्राम/dianapenty)
-
५. कोट : तुम्हाला थोडे रिच विंटर जॅकेट हवे असेल तर तुम्ही कोटची निवड करु शकता. हा कोट जितका लांब असेल तितका तो दिसायला सुंदर असतो. या कोटमुळे तुम्हाला थंडीत उबदारपणाही मिळेल आणि तुम्ही आकर्षक सुद्धा दिसाल. (फोटो:इन्स्टाग्राम/@mrunalthakur)
