-
आजकाल अनेक जण त्यांच्या आवडीनुसार घरात विविध प्राणी पाळतात. कुत्रा, मांजर आदी प्राण्यांना घरी आणल्यानंतर ते आपल्या कुटुंबाचा एक भाग बनतात. तर त्यांना योग्य ते अन्न देणे, त्यांची स्वच्छता राखणे यांसह त्यांची योग्य ती काळजीही वारंवार घ्यावी लागते. (फोटो सौजन्य : Freepik)
-
प्रत्येक ऋतूत पाळीव प्राणी घरात किंवा बाहेर सुरक्षित आणि निरोगी आहेत का यावर आपले लक्ष असले पाहिजे.तर थंडीच्या दिवसात तुमच्या लाडक्या पाळीव प्राण्यांची काळजी घेण्यासाठी काही सोपे उपाय पाहू. (फोटो सौजन्य : Freepik)
-
१. वेळोवेळी तपासणी करा. : तुमच्या पाळीव प्राण्यांची वेळोवेळी योग्य तपासणी करा. त्यांच्याबरोबर छोटे-छोटे खेळ खेळून त्यांना सक्रिय ठेवा जेणेकरून त्यांच्या शरीरात ऊर्जा टिकून राहील आणि ते निरोगी सुद्धा राहतील. (फोटो सौजन्य : Freepik)
-
२. गरम पाण्याने अंघोळ घालणे : प्राण्याच्या अंगावरील त्याचे मऊ केस म्हणजेच फर त्यांच्यासाठी इन्सुलेशन म्हणून काम करतात. म्हणून हिवाळ्यात त्यांचे केस काढणे टाळा. तापमान लक्षात घेऊन त्यांना कोमट किंवा गरम पाण्याने अंघोळ घाला. तसेच आंघोळीनंतर त्यांना लगेच बाहेर घेऊन जाऊ नका. (फोटो सौजन्य : Freepik)
-
३. बाहेर घेऊन जाण्याची वेळ ठरवा : तुमचे पाळीव प्राणी उबदार राहतील याची खात्री करा. थंड वातावरणात नेल्यास त्यांनाही माणसांप्रमाणे सर्दी होऊ शकते.वातावरण जास्त थंड असताना त्यांना घराबाहेर घेऊन जाणे टाळा. (फोटो सौजन्य : Freepik)
-
४. उबदार कपडे : हिवाळ्यात तुम्ही तुमच्या पाळीव प्राण्यांना बाहेर फिरायला घेऊन जात असाल तर त्यांना उबदार हलके कपडे घाला. (फोटो सौजन्य : Freepik)
-
६. पाण्याची विशेष काळजी घ्या : हिवाळ्यात वेळोवेळी प्राण्यांना पाणी देत राहा. या ऋतूत त्यांना थंड पाणी न देता कोमट पाणी देणे फायदेशीर ठरेल. (फोटो सौजन्य : Freepik)
