-
लग्न ही प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाची गोष्ट असते. यादरम्यान साखरपुडा, हळद, लग्न आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. तसेच या कार्यक्रमांना आणखीन कसे खास करता येईल, याकडे प्रत्येकाचे लक्ष असते. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
अनेक जोडपे लग्नासाठी बजेट फ्रेंडली आणि सुंदर जागेच्या शोधात असतात. तर भारतात तुम्ही या पाच ठिकाणी तुमचे डेस्टिनेशन वेडिंग करण्याचा विचार करू शकता. (फोटो सौजन्य:@Freepik)
-
१. गोवा : गोव्यामध्ये डेस्टिनेशन वेडिंग करणं हे प्रत्येकाचे स्वप्न असते. समुद्राच्या किनाऱ्यालगत लग्न करण्याचा अनुभव खास ठरेल आणि हे उत्तम डेस्टिनेशन वेडिंग स्पॉटसुद्धा ठरेल. (फोटो सौजन्य:@Freepik)
-
२. उदयपूर,राजस्थान: तुम्ही उदयपूर राजस्थान येथे पारंपरिक पद्धतीत तुमचा लग्न सोहळा थाटामाटात करू शकता. (फोटो सौजन्य:@Freepik)
-
३. केरळ : बोटहाऊस, किंवा समुद्रकिनारी निसर्गाच्या सानिध्यात असणाऱ्या काही बजेट फ्रेंडली ठिकाणांचा शोध घेऊन तुम्ही केरळमध्ये खास डेस्टिनेशन वेडिंग करू शकता. (फोटो सौजन्य:@Freepik)
-
४. ऋषिकेश : ऋषिकेशमध्ये गंगा नदी, उंच डोगर आणि हिरवीगार झाडे आदी गोष्टी तुमच्या डेस्टिनेशन वेडिंगसाठी योग्य ठरतील. तसेच इथे अनेक हॉटेल्स सुद्धा आहेत ; तिथे तुम्ही तुमच्या बजेट नुसार डेस्टिनेशन वेडिंग प्लॅन करू शकता. (फोटो सौजन्य:@Freepik)
-
५. जयपूर, राजस्थान : शाही पद्धतीत लग्न करण्याची इच्छा असेल तर तुम्ही राजस्थानमधील राजवाड्यांमध्ये सुद्धा डेस्टिनेशन वेडिंग प्लॅन करू शकता. (फोटो सौजन्य:@Freepik)
(डिस्कलेमर: अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. )
पिंपरी- चिंचवड: कुख्यात गुंडाकडून ईदच्या शुभेच्छा; महानगर पालिका, पोलिसांनी केली अशी कारवाई