-
मासिक पाळी हा स्त्रियांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. दर महिन्याला एका ठराविक कालवधीनंतर मासिक पाळी येते पण अनेक स्त्रियांना मासिक पाळी अनियमित येते. अनियमित मासिक पाळीमुळे आरोग्यावर अनेक परिणाम होतात. (Photo : Freepik)
-
कित्येक स्त्रिया या समस्येचा सामना करतात. अनेकदा डॉक्टरांकडे जाऊन सुद्धा काहीही फायदा होत नाही पण आज आम्ही तुम्हाला काही योगा प्रकार सांगणार आहो. हे योगा प्रकार नियमित केल्यामुळे मासिक पाळी नियमित येण्यास मदत होऊ शकते. (Photo : Freepik)
-
योग अभ्यासक मृणालिनी यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मृणालिनी महिलांच्या मासिक पाळीसाठी अतिशय उपयुक्त ठरतील अशी काही योगासने करून दाखवत आहेत. ती योगासने खालीलप्रमाणे (Photo : Freepik)
-
उत्कटकोणासन हे ५-१० वेळा करावे तर मलासन हे ६० सेकंद करावे (Photo : Freepik)
-
बद्धकोणासन हे ६० सेकंद करावे तर अर्धमत्स्येंद्रासन – दोन्ही बाजूने ३०-६० सेकंद करावे (Photo : Freepik)
-
मार्जरीआसन हे ५-१० वेळा करावे. हे आसन खूप कमी लोकांना माहिती असेल पण याचा फायदा तुम्हाला दिसून येईल. (Photo : Freepik)
-
या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “चुकीचा आहार, झोपेच्या अनियमित वेळा, ताण-तणाव, हार्मोनल असंतुलन, पीसीओडी, अनुवंशिकता, अतिरिक्त वजन व शरीराची हालचाल कमी असणे या काही कारणांमुळे मासिक पाळी अनियमित येऊ शकते” (Photo : Freepik)
-
त्या पुढे सांगतात, “आहारात साखर, मीठ, मैद्याचे पदार्थ, तेलकट पदार्थ कमी करा. हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा. सॅलड खावे.भरपूर पाणी प्यावे.अतिरिक्त वजन/ चरबी कमी करा. नियमित चालणे/ पळणे, दोरी च्या उड्या, सूर्य नमस्कार, डायनॅमिक योगासने, व ओटीपोटीवर ताण येईल अशी योगासने करा. (Photo : Freepik)
-
त्याचबरोबर व्हिडीओमध्ये दाखवलेली सगळी योगासने नियमितपणे करा. टेन्शन, ताणतणाव मॅनेज करण्यासाठी प्राणायाम व मेडिटेशन करा, गाणी ऐका, निसर्गात फिरायला जा.” (Photo : Freepik)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख