-
हिवाळ्यात विविध प्रकारच्या भाज्या मिळतात. उन्हाळ्यात जसे फळांचा राजा आंबा आवडतो तसेच हिवाळ्यात भाजीपाल्यांमध्ये वाटाणालाही प्राधान्य दिले जाते.
-
वाटाणा ही एक भाजी आहे जी पोषक तत्वांचे पॉवरहाऊस आहे. लोक या लहान आकाराच्या हिरव्या धान्याचा वापर भाज्या आणि पुलाव शिजवण्यासाठी करतात. वाटाणा ही अशीच एक भाजी आहे जी आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.
-
मटारच्या पौष्टिक घटकांबद्दल बोलायचे तर, 100 ग्रॅम मटारमध्ये कॅलरीज- 81 किलो कॅलरी, कर्बोदके- 14.45 ग्रॅम, आहारातील फायबर- 5.5 ग्रॅम, साखर- 5.67 ग्रॅम, प्रथिने- 5.42 ग्रॅम, फॅट- 0.4 ग्रॅम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी असते.
-
मटारमध्ये व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्स (B1, B2, B3 आणि B6 सह), कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त, अँटीऑक्सिडंट्स असतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.
-
मटारचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मधुमेह असणाऱ्या व्यक्तीही मटारचे सेवन करु शकतात.
-
भरपूर फायबर असलेले मटार खाल्ल्याने पोट जास्त काळ भरलेले राहते आणि भूक कमी होते. हे खाल्ल्यानंतर तुम्ही जास्त खाणे टाळाता आणि तुमचे वजन नियंत्रणात राहते.
-
फायबर मुबलक असलेल्या हिरव्या वाटाणा खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते. मटार मल मऊ करतात आणि बद्धकोष्ठता टाळतात. ज्या लोकांना हिवाळ्यात बद्धकोष्ठतेचा त्रास होतो त्यांनी फायबर युक्त मटारचे सेवन करावे.
-
मटार खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. मटारमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियमसारखे आवश्यक खनिजे असतात जे हाडांचे आरोग्य सुधारतात.
-
मधुमेही मटार खाऊ शकतात का?
ज्यांना रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त आहे ते मटारचे सेवन करू शकतात. भरपूर फायबर असलेले मटार खाल्ल्याने ते हळूहळू पचते, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढण्याचा धोका नाही. मधुमेही रुग्ण हिवाळ्यात १०० ग्रॅम मटार खाऊ शकतात.

VIDEO: “जेव्हा नवरीला मनासारखा नवरा भेटतो” लग्नात नवरीचा भन्नाट डान्स; नवरदेव लाजून लाल तर सासूबाईंची रिअॅक्शनही बघाच