-
महाराष्ट्रात पोहे हा सर्वांचा आवडता नाश्ता आहे. रविवारी सकाळी नाश्ताला पोहे तर लग्न ठरवताना देखील कांदे-पोह्यांचा कार्यक्रम आवर्जून ठेवला जातो. झटपट तयार होणाऱ्या या पोह्याचे अनेक प्रकार आहेत . भारतात वेगवेगळ्या पद्धतीत पोहे बनवले जातात. तर आज आपण या पोह्यांचे काही खास प्रकार पाहणार आहोत. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
१. महाराष्ट्राचे कांदे पोहे : कांदे-पोहे तर आपल्या सगळ्यांच्या आवडीचे आहेत. कांदे, शेंगदाणे घालून तयार केलेले हे पोहे खूप चविष्ट लागतात. तसेच पोहे तयार झाल्यावर त्याच्यावरून शेव, कोथिंबीर, लिंबू, ओलं खोबऱ्याने सजवले जाते.(फोटो सौजन्य : @Pixabay)
-
२. बंगाली पोहे : सुप्रसिद्ध ‘चिरेर पुलाव ’ म्हणजेच बंगाली पोहे हे पश्चिम बंगालमधील लोकप्रिय पाककृती आहे. हे शेंगदाणे, मोहरी, कांदा, हिरवी मिरची आणि इतर मसाल्यांच्या मिश्रणासह बनवण्यात येतात. (फोटो सौजन्य : @Pixabay)
-
३. दही पोहे : नाश्त्यासाठी हा सर्वात सोपा आणि झटपट तयार होणार पदार्थ आहे. दही, मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता आणि विविध प्रकारचे मसाल्यांमध्ये हे पोहे तयार केले जातात आणि वरून भाजलेल्या काजूने सजवले जातात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
४. गोज्जू अवलक्की पोहे : गोजू अवलक्की पोहे हा कर्नाटकातील एक लोकप्रिय पदार्थ आहे. पोहे चिंचेच्या सॉसच्या मदतीने बनवले जातात. त्यात कढीपत्ता, मोहरीचे दाणे, हळद, लाल तिखट आणि गूळ यांसारखे पदार्थांमुळे हे पोहे मसालेदार बनतात. (फोटो सौजन्य : @Pixabay)
-
५. इंदोरी पोहे : इंदोरी पोहे त्याच्या अनोख्या पद्धतीसाठी प्रसिद्ध आहे. या पोह्यात एक खास इंदोरी मसाला ‘जीरावण मसाला’ जोडला जातो, ज्यामुळे तो खूपच स्वादिष्ट होतो. पोह्यात किसलेले खोबरे, मोहरी, एक बडीशेप, कोथिंबीर आणि सुगंधी मसाल्यांच्या मिश्रणाने बनवले जातात.(फोटो सौजन्य : @Pixabay)
-
६. नागपूर तर्री पोहा : हा नागपूरचा लोकप्रिय नाश्ता आहे. चिवडा, चणे, मसाले, मोहरी यांची खास ग्रेव्ही तयार पोह्यांवर टाकण्यात जाते म्हणजेच सावजी मसाला घातलेली झणझणीत तर्री घालतात आणि हे पोहे तयार केले जातात. (फोटो सौजन्य : @Pixabay)
-
७. गुजराती बटाटा पोहा : यात बटाटे घालून पोहे शिजवले जातात. बारीक केलेले बटाटे कढीपत्ता, मोहरी, जिरे, कांदे आणि हिरव्या मिरच्या यांसारख्या मसाल्यांच्या मिश्रणाने परता. भिजवलेले पोहे मध्यम आचेवर लिंबाचे दोन थेंब टाकून शिजवून घ्या. तुमचे गुजराती बटाटा पोहे तयार. (फोटो सौजन्य : @Pixabay)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”