-
नवरा बायको असो की प्रियकर प्रेयसी, या नात्यामध्ये एकमेकांना समजून घेणे खूप जास्त गरजेचे आहे. नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा, आपुलकी या सर्व गोष्टी असणे तितकेच महत्त्वाचे आहे. (Photo : Freepik)
-
अनेकदा जोडीदाराकडून अपेक्षा ठेवल्या जातात आणि जेव्हा या अपेक्षा पूर्ण होताना दिसून येत नाही तेव्हा नात्यात तेढ निर्माण होते. अपेक्षांचे ओझे वाढले की नाते तुटून पडते. अशावेळी काय करावे काहीही सुचत नाही. (Photo : Freepik)
-
मनात अनेक शंका निर्माण होतात. समोरचा व्यक्ती आपल्यासाठी योग्य आहे का? जोडीदार खरंच आपल्यावर प्रेम करतो का? खरंच तो आपल्याविषयी सीरीअस आहे का? या प्रश्नांची उत्तरे कशी मिळवायची, हे सुद्धा खूप कठीण असते. (Photo : Freepik)
-
जर तुम्हालाही प्रश्न पडला असेल की तुमचा जोडीदार तुमच्याविषयी सीरीअस आहे का नाही तर टेन्शन घेऊ नका. (Photo : Freepik)
-
रिलेशनशिप तज्ज्ञ व सल्लागार मॅथ्यू हसी यांनी तुमचा जोडीदार तुमच्याविषयी सीरीअस आहे की नाही, हे ओळखण्यासाठी चार गोष्टी सांगितल्या आहेत. या चार गोष्टींच्या मदतीने तुम्ही तुमचा खरा जोडीदार ओळखू शकता. (Photo : Freepik)
-
१. नात्यात एकमेकांच्या विचारांचा आदर करणे गरजेचे आहे. कोणताही लहान मोठा निर्णय घेताना तुमचा जोडीदार तुमचा विचार करतात का? आणि तुमचा सल्ला घेतात का? किंवा तुमचा जोडीदार तुम्हाला एखादा निर्णय घेतल्यानंतरच सर्वकाही सांगतात. यावरुन तुम्हाला कळेल की जोडीदार तुम्हाला किती महत्त्व देतो. (Photo : Freepik)
-
२. तुमचा जोडीदार तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करतोय का की फक्त तुमच्या सहवासाचा आनंद घेताहेत, हे समजून घ्या. ते तुम्हाला सातत्याने तुमच्या नातेसंबंधाविषयी प्रश्न विचारतील कारण यावरुन तुम्ही त्यांच्या आयुष्यात किती महत्त्वाचे आहे, हे समजू शकता. (Photo : Freepik)
-
३. ज्यांना संपूर्ण आयुष्य तुमच्याबरोबर घालवायचे आहे ते नेहमी तुमच्याबरोबर बोलताना भविष्याचा उल्लेख करतील. ते नेहमी तुमच्याबरोबर भविष्य पाहण्यासाठी उत्सूक असेल. (Photo : Freepik)
-
४. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा जोडीदार ज्या गोष्टी बोलतील तेच करतील. यावरुन तुम्हाला कळेल की ते तुमच्याविषयी किती सीरीअस आहे. (Photo : Freepik)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”