-
राशीचक्रातील सर्वात पहिली रास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेष राशीचे २०२४ हे वर्ष व्यवसायाच्या दृष्टीकोनातून अत्यंत फायदेशीर असेल.करिअरच्या दृष्टीकोनातून हे वर्ष प्रगतीशील असेल. हूशार लोकांच्या संगतीमध्ये राहाल तर बुद्धीचा विकास होऊ शकतो. मेष राशीच्या कुटूंबासाठी हे वर्ष उत्तम असेल. काही लोकांचे विवाह योग जुळून येतील. कौटूंबिक सलोखा दिसून येईल. (Photo : Loksatta)
-
वृषभ राशीचे लोकांना नातेसंबंधांमध्ये चढउतार पाहायला मिळू शकतो. त्यांच्या नात्यात तणाव दिसून येईल. नोकरी करणाऱ्या लोकांना पुढील वर्षी सुद्धा भरपूर मेहनत घ्यावी लागेल. पुढील वर्ष वृषभ राशीसाठी आर्थिकदृष्ट्या मिश्रित परिणामाचे असेल. वृषभ राशीचे २०२४ मध्ये कौटूंबिक संबंध चांगले राहतील. यांना कुटूंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. (Photo : Loksatta)
-
ज्योतिषशास्त्रानुसार, मिथुन राशीचा स्वामी ग्रह हा बुध असतो. बुध हा बुद्धी , व्यापार आणि ज्ञानाचा कारक असतो. या वर्षी शनि देवाची या राशीवर भरपूर कृपा राहील. काम आणिज्योतिषशास्त्रानुसार मिथुन राशीचे वैवाहिक जीवन २०२४ मध्ये खूप चांगले राहील. जे लोक अविवाहित आहे त्यांना मे महिन्यापूर्वी विवाहाचे योग येईल. व्यवसायाच्या दृष्टीकोनातून हे वर्ष मिथुन राशीसाठी उत्तम राहील. (Photo : Loksatta)
-
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार कर्क राशीच्या लोकांसाठी २०२४ हे वर्ष काम आणि व्यवसायाच्या दृष्टीने चांगले ठरू शकते.२०२४मध्ये कर्क राशीच्या लोकांची वर्षाच्या सुरुवातीला आर्थिक स्थितीमध्ये सुधारली जाऊ शकते. वैदिक ज्योतिषशास्त्रनुसार, या वर्षी कर्क राशींच्या लोकांचे प्रेम संबध आणि वैवाहिक जीवनमध्ये थोडा चढ-उतार होऊ शकतो. (Photo : Loksatta)
-
राशीचक्रातील सिंह ही महत्त्वाची रास आहे. या राशीचा स्वामी सुर्य आहे. या राशीच्या लोकांना २०२४मध्ये अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागेल. कधी पदरी यश येईल तर कधी निराशा येईल. सिंह राशीच्या लोकांनी खचून जाऊ नये. यश अपयश हा जीवनाचा भाग आहे. सिंह राशीच्या लोकांसाठी व्यवसायाच्या दृष्टीकोनातून हे वर्ष विशेष प्रगतशील असेल. या लोकांची कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा वाढेल. पदोन्नतीचा योग येईल. व्यवसायात वाढ होईल. (Photo : Loksatta)
-
कन्या राशीवर बुध ग्रहाचे वर्चस्व असते. बुध ग्रह हा बुद्धी, संवाद कौशल्य, बँकीग, अर्थव्यवस्था आणि व्यवसायचा कारक मानला जातो. व्यवसाय, नोकरी आणि कामाच्या दृष्टीकोनातून २०२४ हे वर्ष कन्या राशीसाठी खूप चांगले असणार. या वर्षी विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करू नये.कन्या राशीच्या वैवाहिक जीवनात आणि नातेसंबंधांमध्ये चढउतार पाहायला मिळतील. (Photo : Loksatta)
-
तूळ ही सौख्य, समृद्धी आणि आनंद देणाऱ्या शुक्राची रास आहे. हे लोक नेहमी आनंद असतात. २०२४ वर्ष काम आणि व्यवसायाच्या दृष्टीकोनातून तूळ राशीसाठी चांगले आहे. सर्व कामे यशस्वी होणार. आर्थिक स्थिती चांगली असेल तर सर्व गोष्टी नीट होतात. तूळ राशी राशीच्या लोकांची नवीन वर्षात आर्थिक स्थिती चांगली राहील.या वर्षी तूळ राशीचे वैवाहिक आयुष्य आणि प्रेमसंबंध खूप चांगले असणार. वैवाहिक जीवनात आनंद लाभेल. (Photo : Loksatta)
-
ज्योतिष शास्त्रानुसार, वृश्चिक राशीतील लोकांसाठी येणारे नवीन वर्ष बऱ्याच दृष्टीने महत्वाचे ठरु शकते. कारण, या वर्षी २०२३ मध्ये तुम्हाला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला होता. आता येणारे नवे वर्ष या राशींच्या लोकांसाठी संमिश्र असेल. वृश्चिक राशीच्या लोकांना या वर्षी अनेक बदलांना सामोरे जावे लागू शकते. ज्योतिष शास्त्रानुसार, २०२४ मध्ये वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात. या राशीच्या लोकांचे नवीन वर्षात प्रेम संबंध व वैवाहिक जीवन अधिक मजबूत होऊ शकतात. वर्ष २०२४ च्या अखेरीस प्रेम प्रकरणातील लोक विवाह करू शकतात. (Photo : Loksatta)
-
ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे. शनी हा कर्माचे फळ देणारा आणि न्यायाची देवता मानला जातो. म्हणजेच शनि ग्रह माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. तसेच प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात तीनदा शनिदेवाच्या साडेसतीला सामोरे जावे लागते असे मानले जाते. सध्या मकर राशीत साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात शनिदेव तुम्हाला कठोर परिश्रम करायला लावतात. तसेच या अवस्थेत मानसिक अस्वस्थता कायम राहून भौतिक सुखाची प्राप्ती होते आणि प्रगतीही आहे.२०२३ पेक्षा २०२४हे वर्ष तुमच्यासाठी खूप चांगले असेल. या वर्षी तुम्हाला नोकरी-व्यवसायात लाभ होईल. (Photo : Loksatta)
-
ज्योतिषशास्त्रानुसार २०२४ हे वर्ष धनु राशीसाठी भाग्यवान ठरणार आहे. या लोकांना भरपूर चांगल्या संधी मिळतील कठीण परिस्थितीत सुद्धा त्यांना भरपूर यश मिळेल. त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. धनु राशीचे वैवाहिक आयुष्य २०२४मध्ये चढउताराने भरलेले दिसून येईल. नात्यात वादविवाद होण्याची शक्यता आहे. (Photo : Loksatta)
-
ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीच्या लोकांसाठी २०२४ हे वर्ष चांगले असणार आहे. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. जमीन, वाहन, घर, इत्यादी सुख सुविधा वाढणार. पैसा कमावण्याची संधी दिसून येईल.मेहनतीचे फळ मिळेल.सुख प्राप्ती योग दिसून येईल.जानेवारी ते डिसेंबर या महिन्यात चढउतार दिसून येईल, शिक्षण आणि करिअरच्या दृष्टीकोनातून हे वर्ष या राशीच्या लोकांचे चांगले जाईल. नातेसंबंधांसाठी हे वर्ष सकारात्मक राहील. कौंटूबिक सहकार्य लाभेल. (Photo : Loksatta)
-
१ मे नंतर मीन राशीच्या लोकांना व्यवसाय क्षेत्रात यश मिळेल. त्यांचा विकास होईल. आर्थिक स्थितीबरोबर त्यांचे वैवाहिक आयुष्यात सुद्धा सकारात्मकता जाणवेल आणि त्यांची जबाबदारी वाढेल. एकंदरीत आर्थिकदृष्ट्या या राशीचे नवीन वर्ष उत्तम असेल. नव्या वर्षात मित्रांबरोबरचे नाते दृढ होतील. विद्यार्थ्यांसाठी वर्षाच्या सुरुवातीचे दिवस चांगले असेल (Photo : Loksatta)

दुबईतील वाळवंटात पोहोचलेल्या मराठी अभिनेत्रीला ओळखलं का?