-
नवीन वर्षाचं स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोप देताना अनेकजण जोरदार सेलिब्रेशन करतात, मोठ्या पार्टी होतात.
-
पब, डिस्को, हॉटेल इथं जाऊन सेलिब्रेशन केलं जातं. या पार्टीदरम्यान सॉफ्ट ड्रिंक्ससोबतच हार्ड ड्रिंक्स अर्थात दारूचं सेवन करणंही काहीजण पसंत करतात.
-
मात्र मर्यादेपेक्षा जास्त सेवन केल्यास त्याचा त्रासही होतो. यालाच हँगओवर म्हणतात. हा हँगओवर कसा दूर करावा, यासाठी काही घरगुती उपाय जाणून घेऊया.
-
हँगओवर दूर करण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे लिंबूपाणी. जोरदार पार्टीनंतर उठल्याबरोबर लिंबूपाणी प्यावे, जेणेकरून तुमचा हँगओवर लवकर दूर होईल.
-
हँगओवर दूर करण्यासाठी गुळाचा वापरही केला जाऊ शकतो. गूळ आपल्याला घरात सहज उपलब्ध होऊ शकतो.
-
गुळात तीळ आणि आलं मिसळून त्याची पेस्ट तयार करावी. सकाळी उठल्याबरोबर ही पेस्ट खाल्ल्यास हँगओवरमुळे दुखणारं डोकं शांत व्हायला मदत होईल.
-
हँगओवर दूर करण्यासाठी सायट्रिक अॅसिड अतिशय परिणामकारक आहे. त्यामुळे याचा समावेश असलेली संत्री, नाशपती, पेरू, अननस अशी फळं सकाळी उठल्याबरोबर नाश्त्यासोबत खाल्ल्यास हँगओवर दूर व्हायला मदत होऊ शकते. या फळांचा रस पिणंही परिणामकारक ठरू शकतं.
-
हँगओवर दूर करण्यासाठी आलं फार उपयुक्त घटक मानला जातो. यासाठी आधी आलं थोडंसं भाजून घ्या आणि त्यानंतर चहामध्ये टाकून हा चहा सकाळी उठल्यावर प्या. जेणेकरून तुमची डोकेदुखी तसेच हँगओवर दूर होण्यास मदत होईल.
-
हँगओवर घालवण्यासाठी भरपुर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पार्टी करण्यापुर्वी दिवसभर तुम्ही पाणी पिऊ शकता आणि पार्टी झाल्यानंतरही पाणी पित राहा.
-
हँगओवरमध्ये अनेकजण नाश्ता किंवा काहीही खाण टाळतात. पण अन्नपदार्थ हँगओवर उतरवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे योग्य आणि पुरेशा प्रमाणात नाश्ता करणे आवश्यक असते.
-
टोमॅटोचा रसदेखील हँगओवर उतरवण्यासाठी फायदेशीर मानला जातो. काही रिपोर्ट्सनुसार टोमॅटोच्या रसामध्ये असलेले इलेक्ट्रोलाइट्स रक्तातील अल्कोहोलची पातळी कमी करण्यास मदत करतात.
-
येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. कोणतेही उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. (सर्व फोटो : फ्रीपिक)

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…