-
आजच्या स्पर्धात्मक जगात सतत काही तरी शिकत राहणे आणि एक एक पायरी पुढे जाणे खूप महत्वाचे आहे. या सर्व गोष्टींमुळेच आपला विकास होतो. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
जर तुम्हाला येत्या वर्षात एखाद्या विशिष्ठ क्षेत्रात करियर करायचे असेल. तर तुम्हाला ध्येय निश्तिच करणे अत्यंत महत्वाचे आहे.(फोटो सौजन्य: @Freepik )
-
नव वर्षात अनेक जण ध्येय निश्चित करतात पण, अनेक जणांना हे ध्येय पूर्ण करण्यासाठी कोणते प्रयत्न करायचे हे माहित नसते. तर आज आपण ध्येय निश्चित केल्यानंतर ते पूर्ण करण्यासाठी काय करायला पाहिजे हे पाहू. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
१. ध्येय शोधा : पहिली पायरी म्हणजे तुम्हाला कोणती ध्येय निश्चित करायचे आहेत हे ठरवणे. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
२. नोंद करा : एकदा तुम्ही तुमचे ध्येय नक्की काय आहे हे शोधून काढल्यानंतर, पुढील पायरी म्हणजे त्यांना एका वहीत किंवा डायरीत लिहून ठेवा आणि तुमच्या जवळ ठेवा. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
३. योजना तयार करा : तिसरी पायरी म्हणजे तुमची ध्येय पूर्ण करण्यासाठी योजना (प्लॅन) तयार करा. त्या प्लॅननुसार दररोज एक-एक पायरी पुढे जा आणि काही दिवसातच तुमचं ध्येय तुमच्या दैनंदिन वेळापत्रकाचा एक भाग होईल. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
४. दररोज आपल्या ध्येयांवर कार्य करा : आपल्यापैकी बरेच जण ध्येय तर ठरवतात. पण, त्याच्यावर दररोज काम करत नाहीत खूप विलंब करतात. जर तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करायचे असेल तर सातत्यपूर्ण प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. ब्रेक घ्या पण तुमच्या ध्येयांवर सुद्धा लक्ष केंद्रित करा. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
५. तुमच्या प्रगतीचे निरीक्षण करा : एखाद्या गोष्टीवर तुम्ही काम करत असताना तुमच्यात कुठे कमतरता आहे आणि तुम्हाला कोणत्या गोष्टीत सुधारणा करणे गरजेचे आहे हे समजून घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik )
IND vs PAK: “माझी विकेटनंतर सेलिब्रेट करण्याची…”, गिलला बोल्ड केल्यानंतर भुवई उंचावणाऱ्या पाकिस्तानच्या अबरारचं मोठं वक्तव्य; सामन्यानंतर काय म्हणाला?