-
हिवाळ्यात अनेक फळे बाजारात उपल्बध असतात. त्यातलं सगळ्यांचं आवडत फळ म्हणजे पेरू. मसाला आणि मीठ लावून पेरू खाण्याची एक वेगळीच मज्जा आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तसेच गुलाबी पेरू हा बाजारात उपल्बध असलेला पेरूचा एक प्रकार आहे. हे खाण्यास स्वादिष्ट तर आहेच. पण, आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. चला जाणून घेऊ गुलाबी पेरू खाण्याचे काही फायदे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
१. कॉलेस्टेरॉल कमी करते :पेरूचा गुलाबी प्रकार एक फायबर फळ आहे ; जे खराब कोलेस्ट्रॉल (LDL) पातळी कमी करण्यास मदत करतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
२. रोग प्रतिकारशक्ती वाढते: गुलाबी पेरू मध्ये व्हिटॅमिन सी हा रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
३. त्वचेचे संरक्षण करते : गुलाबी पेरूमध्ये अँटीऑक्सिडंट्स , बीटा-कॅरोटीन आणि लाइकोपीन मुबलक प्रमाणात आढळतात. जे शरीरातील मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात. तसेच हे त्वचेचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
४. वजन कमी करण्यास उपयुक्त :गुलाबी पेरूमध्ये जास्त प्रमाणात पाणी, फायबर सामग्री तसेच इतर पोषक घटक असतात. त्यामुळे वजन कमी करणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय ठरेल. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
५. रक्तदाब नियंत्रित करते : गुलाबी पेरूमध्ये पॉटेशियम भरपूर असते. यामुळे हे रक्तदाब नियंत्रण करण्यास देखील महत्वाची भूमिका बजावतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
६. मधुमेहासाठी फायदेशीर : गुलाबी पेरूचा कमी ग्लायसेमिक इंडेक्स आणि उच्च फायबर मधुमेह असणाऱ्या व्यक्तींसाठी एक चांगला पर्याय बनवते.तसेच रक्तातील ग्लुकोजच्या पातळीत जलद वाढ टाळण्यास मदत करते. (फोटो सौजन्य: @Freepik) (टीप : अधिक माहितीसाठी आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )

महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन