-
शिमला मिरचीचा वापर अनेक भाज्यांमध्ये केला जातो. तसेच, याचा वापर पिझ्झा, नूडल्स आणि पास्तापर्यंतच्या अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये केला जातो. (फोटो : Freepik)
-
शिमला मिरचीचे वेगवेगळे रंग असतात. जसे की, हिरवा, लाल, पिवळा रंग. या वेगवेगळ्या रंगांच्या भाज्या एकमेकांत मिसळून पदार्थाची शोभा आणखी वाढवतात. (फोटो : Freepik)
-
हिरवी, लाल, पिवळी, केशरी आणि काळी शिमला मिरची, या सर्वांमध्ये असलेली जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स हे आपल्यासाठी वरदान आहेत. (फोटो : Freepik)
-
चला तर मग जाणून घेऊया कोणती सिमला मिरची सर्वात जास्त फायदेशीर ठरु शकते. (फोटो : Freepik)
-
“लाल शिमला मिरचीमध्ये हिरव्या आणि पिवळ्या मिरचीपेक्षा जास्त प्रमाणात ‘ए’ जीवनसत्व असते. (फोटो : Freepik)
-
हिरव्या शिमला मिरचीची कापणी पूर्ण पिकण्यापूर्वी केली जाते, त्यामुळे तिला लाल मिरचीपेक्षा किंचित जास्त कडू चव असते. तसेच त्यात व्हिटॅमिन K चे उत्कृष्ट स्त्रोत आहे. (फोटो : Freepik)
-
लाल आणि हिरव्या शिमला मिरची प्रमाणेच पिवळ्या शिमला मिरचीमध्ये देखील ‘ए’ आणि ‘क’ जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. (फोटो : Freepik)
-
ब्लॅक शिमला मिरचीमध्ये सर्वात जास्त प्रमाणात अँटिऑक्सिडेंट असतात जे कॅन्सरशी लढण्यास मदत करतात. (फोटो : Freepik)
-
ऑरेंज शिमला मिरचीमध्ये बीटा कॅरोटीन आढळते जे त्याला केशरी रंग देते. बीटा कॅरोटीन डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. ते रेटिनाचे संरक्षण करते. (फोटो : Freepik)
प्रसिद्ध अभिनेत्रीने बिझनेसमनशी केला साखरपुडा, आजपासून लग्नाआधीच्या सेलिब्रेशनला सुरुवात, ‘या’ शहरात होणार लग्न