-
चहा प्रेमींसाठी मसाला चहा हा अगदीच जिव्हाळ्याचा विषय आहे. मित्र-मैत्रिणींबरोबर चहाच्या टपरीवर किंवा हॉटेलमध्ये जाऊन हा चहा पिणे अनेकांना आवडते. तसेच काही जण थंडीच्या दिवसात हा मसाला चहा घरच्या घरी बनवून त्याचा आनंद घेतात. (फोटो सौजन्य:@Freepik)
-
तर आज आपण मसाला चहा बनवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे पाहू. (फोटो सौजन्य:@Freepik)
-
गरम पाणी वापरणे : तुमच्या चहाची चव पाण्यावर अवलंबून असते. त्यामुळे प्रमाण ठरवून फिल्टर केलेले पाणी वापरा. (फोटो सौजन्य:@Freepik)
-
चहाची पाने : चहा बनवण्यासाठी चांगल्या पानांचा उपयोग करा. कच्ची चहाची पाने अनेकदा कमी सुगंधीत असतात आणि परिणामी चवीला चहा चांगला होत नाही. (फोटो सौजन्य:@Freepik)
-
दूधाचे प्रमाण : कच्च्या दुधाऐवजी उकळून घेतलेले दूध वापरा. तसेच, दूध आणि पाण्याचे प्रमाण संतुलित असावे. जास्त दूध घातल्याने चहाची पाने आणि मसाल्यांची चव कमी होऊ शकते. (फोटो सौजन्य:@Freepik)
-
साखर घालण्याची योग्य वेळ: चहा बनवतात सगळ्यात शेवटी साखर घाला. याने चहाचा नैसर्गिक रंग राखण्यास मदत होते. सुरवातीला साखर घातल्यास चहाचा रंग जास्त गडद होऊ शकतो. (फोटो सौजन्य:@Freepik)
-
मसाला टाकण्याचे प्रमाण ठरवणे : जास्त लवंग आणि दालचिनीमुळे चहा जास्त मसालेदार होऊ शकतो. आलं, दालचिनी आणि लवंगा यांचे प्रमाण संतुलित करणे महत्वाचे आहे. चहात हे सर्व मसाले चांगले कुस्करून घातले आहेत ना याची एकदा खात्री करून घ्या. (फोटो सौजन्य:@Freepik)
-
चहा जास्त उकळवणे टाळा : मसाला चहा जास्त उकळल्याने कडू होऊ शकते. म्हणून, चहाची पाने, मसाले आणि दूध घालून हलक्या हाताने उकळवणे महत्वाचे आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
चहा गाळणे : चहा गाळण्यासाठी नेहमी बारीक गाळणीचा उपयोग करा. तसेच चहाची पाने कधीही पिळू नका. कारण – त्यामुळे चहा कडू होऊ शकतो.
(फोटो सौजन्य:@Freepik) -
एकदा बनवलेली मसाला चहा पुन्हा गरम करू नका. यामुळे चहाची चव सुद्धा बिघडते आणि पोटदुखी, जळजळ आदी त्रास होण्याची शक्यता असते. (फोटो सौजन्य:@Freepik)
IND vs PAK: “माझी विकेटनंतर सेलिब्रेट करण्याची…”, गिलला बोल्ड केल्यानंतर भुवई उंचावणाऱ्या पाकिस्तानच्या अबरारचं मोठं वक्तव्य; सामन्यानंतर काय म्हणाला?