-
तूप मिसळून बनवलेली कॉफी ही बुलेटप्रूफ कॉफी म्हणून ओळखली जाते. कॉफी शरीराचे कार्य चांगले ठेवण्यासाठी मदत करते. त्यामध्ये तूप घातल्यामुळे आणखी फायदे मिळतात.
-
वजन कमी करण्यासाठी पोटाचे कार्य सुरळीत असणे गरजेचे असते. कॉफीमध्ये तूप घालून प्यायल्यामुळे पचनाचे कार्य चांगले होते.
-
कॉफीमध्ये तूप घालून पिण्याचे फायदे
ऊर्जा प्रदान करते : जर तुम्हाला थोडासा थकवा आल्यासारखे वाटत असेल तर तूप मिसळून बनवलेली कॉफी प्यायल्याने तुमचा थकवा दूर होऊ शकतो व तुम्हाला ऊर्जा मिळते. -
यकृताचे कार्य सुरळीत होते- कॉफीमध्ये तूप घालून प्यायल्यामुळे यकृताचे कार्य सुरळीत होते.
-
भूक नियंत्रित करते: कॉफीमध्ये तूप मिसळून या पेयाचे तुम्ही सेवन केल्यास शरीराला दुप्पट फायदे मिळतील. वजन कमी करण्यासाठी तुम्ही या कॉफीचा आधार घेऊ शकता. कारण या कॉफीमुळे भूक लागण्याचं प्रमाण कमी होतं.
-
कोलेस्ट्रॉल कंट्रोल: तूप मिसळून बनवलेली कॉफी घाणेरडं कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी तुम्हाला फायदेशीर ठरु शकते.
-
तूप मिसळून बनवलेली कॉफी त्वचेसाठी उपयुक्त आहे. तूप हे शरीराच्या आरोग्यासाठी कायमच उत्तम मानलं जातं. त्याचे असंख्य फायदे आहेतच. तूप आणि कॉफी हे कॉम्बिनेशन फायदेशीर ठरु शकते.
-
परंतु, कोणतीही गोष्ट अती प्रमाणात ही घातकच असते. आहारात महत्त्वपूर्ण बदल करण्यापूर्वी तुमच्या डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या. -
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, गरज भासल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या) (फोटो सौजन्य : freepik)

२८ फेब्रुवारी राशिभविष्य: महिन्याचा शेवटचा दिवस ‘या’ तीन राशींचे भाग्य पालटणार? कोणाला कामातून आनंद तर कोणाला अनपेक्षित लाभ होणार