-
आजकाल तरुणांमध्येही केसांच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे, लहान वयातच केस पांढरे होणे, गळणे आणि पातळ होणे यासारख्या समस्या उद्भवू लागल्या आहेत.
-
त्याची अनेक कारणे असू शकतात. या सगळ्याच्या मागे सर्वात महत्वाचे कारण केसांना तेल न लावणे देखील असू शकते.
-
तरुणांमध्ये केसांच्या समस्या अधिक आढळतात. तेल लावल्याने केस खूप स्निग्ध होतात. त्यामुळे बहुतेक तरुण रोज तेल लावणे टाळतात.
-
जर तुम्हाला जाड, लांब, चमकदार केस हवे असतील तर हे चार प्रकारचे तेल उपयोगी पडू शकतात.
-
१. रोझमेरी तेल
रोझमेरी ऑइल किंवा रोझमेरीची पाने तुमच्या केसांसाठी खूप उपयुक्त आहेत. हे पान पाण्यात उकळून थंड करून ते पाणी डोक्याला लावल्याने केसांची वाढ होते. -
रोझमेरीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत आणि ते जीवनसत्त्वे A, C आणि B6 ने समृद्ध आहे. त्यामुळे त्याचे तेल वापरल्याने केसांची वाढ आणि केस घट्ट होण्यास मदत होते. -
२. अर्गन तेल
अर्गन ऑइलमध्ये अ, क आणि ई जीवनसत्त्वे जास्त असतात. यासोबतच अँटिऑक्सिडंट्स आणि ओमेगा 6 फॅटी अॅसिडही मिळतात. -
या तेलाच्या वापराने केस गळणे कमी होते; परिणामी केस दाट होतात. हे टाळूला मऊ करते आणि कोंडा दूर करण्यास मदत करते -
३. कांदा तेल
कांद्याचे तेल तुमच्या केसांसाठी तसेच स्कॅल्पसाठी खूप फायदेशीर आहे. या तेलात अँटिऑक्सिडेंट असतात, ज्यामुळे तुमच्या टाळूची काळजी घेतली जाते. हे तेल त्वचेचे समस्यांही दूर करते. -
कांद्याचे तेल घरी बनवता येते. यासाठी खोबरेल तेलात कांद्याचे तुकडे टाकून तेल उकळवा. कांद्याचा रंग बदलल्यानंतर गॅस बंद करा आणि गाळणीने तेल गाळून घ्या. -
४. बदाम तेल
बदामाच्या तेलामुळे केस तुटण्याच्या आणि गळण्याच्या तक्रारी थांबतात. हे स्कॅल्प मऊ करण्याचेही काम करते. याचे उत्तम फायदे मिळवण्यासाठी, आंघोळीच्या किमान एक तास आधी केसांना किंचित कोमट बदामाचे तेल मुळापासून टोकापर्यंत लावा. -
नंतर आंघोळीच्या वेळी केस चांगले धुवा. हे तेल तुमचे केस दाट, मऊ आणि चमकदार बनविण्यात मदत करेल.

‘दारूचा नाद वाईट!’, स्वारगेट चौकात फिटनेसचे धडे गिरवतोय हा मद्यपी, पुण्यातील Video Viral