-
जानेवारीत येणारा पहिला सण म्हणजे ‘मकर संक्रांत’ ; जो दरवर्षी १४ जानेवारीला येतो. या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले जातात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
‘तिळगूळ घ्या; गोड गोड बोला’, असे म्हणत तिळाचे लाडू देऊन मकर संक्रांत आपल्याकडे साजरी केली जाते. (फोटो सौजन्य:@Freepik)
-
मकर संक्रांतीला स्त्रिया हळदीकुंकू ठेवतात आणि इतर स्त्रियांना वाण देतात. तर मकर संक्रांतीनिमित्त कोणते गोड पदार्थ तयार केले जातात हे पाहू. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तिळाचे लाडू : पांढरे तीळ, गूळ, वेलची पावडर, शेंगदाणे, भाजलेली चण्याची डाळ वापरून स्वादिष्ट तिळाचे लाडू तयार केले जातात. (फोटो सौजन्य:@Freepik)
-
तीळ लावलेले भोपळ्याचे वडे : संक्रांतीला तीळ लावलेले भोपळ्याचे वडे तांदळाच्या किंवा रव्याची खीर बरोबर खाल्ले जातात. भोपाळ किसून गूळ टाकून कुकरमध्ये एक शिट्टी द्या. नंतर बेसनच पीठ आणि भोपळ्याचे मिश्रण मळून घ्या आणि वडे थापताना त्याला तीळ लावून तळून घ्या. (फोटो सौजन्य:@Freepik)
-
तिळाची रेवडी : साखर, तीळ, गुळ या पदार्थांपासून बनवली जाणारी तिळाची रेवडी खायला जितकी छान तितकीच हेल्दी सुद्धा आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
शेंगदाण्याची चिक्की : शेंगदाणे, गूळ, तूप, सुका मेवा यांपासून शेंगदाण्याची चिक्की बनवली जाते. (फोटो सौजन्य: @Freepik)
