-
आचार्य चाणक्य ही एक महान व्यक्ती होती. त्यांनी यशस्वी, आनंदी आणि सुखी जीवन जगण्यासाठी अनेक नीती सांगितल्या आहेत. त्यांच्या नीतीचे अनेक जण आजही अनुकरण करतात. (Photo : Loksatta)
-
इतरांना मदत करावी, असे अनेक जण आवाहन करतात पण चाणक्य यांनी तीन लोकांना चुकूनही मदत करू नये, असे सांगितले आहेत. ( (Photo : Loksatta)
-
अनेकदा आपण चांगल्या वाईट गोष्टींचा विचार न करता कुणालाही मदत करतो पण अनेकदा आपला हा चांगुलपणा आपल्यावरच पश्चातापाची वेळ आणतो. चाणक्य यांनी सांगितलेले ही तीन लोकं कोणती, चला तर जाणून घेऊ या. (Photo : Loksatta)
-
चाणक्य सांगतात की व्यसन करणाऱ्या लोकांची चुकूनही मदत करू नये. असे लोकं कधी तुम्हाला मदत मागतील तर त्यांना थेट नाही म्हणा. कारण असे लोकं व्यसनाच्या नादात सर्वकाही विसरतात आणि यांना पैशांची सुद्धा किंमत नसते. (Photo : Freepik)
-
नशेत असताना हे लोकं कुणालाही नुकसान पोहचवू शकतात. चाणक्य यांच्या मते, या लोकांना चांगले वाईट याच्यातील फरक कळत नाही. त्यामुळे अशा लोकांची मदत करू नये. (Photo : Freepik)
-
चाणक्य सांगतात, ज्या लोकांचे व्यक्तिमत्त्व चांगले नाही त्यांच्यापासून दूर राहणे, नेहमी योग्य असते. अशा लोकांना मदत करू नये. (Photo : Freepik)
-
ज्या लोकांचे व्यक्तिमत्त्व चांगले नाही, अशा लोकांची मदत केल्यामुळे तुम्ही सुद्धा अडचणीत येऊ शकता.त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहावे. (Photo : Freepik)
-
चाणक्य यांच्या मते, जे लोक जीवनात समाधानी नसतात ते नेहमी दु:खी असतात.या लोकांना मदत करुन आपल्या वाटेला पण दु:ख येतं. (Photo : Freepik)
-
जीवनात समाधानी नसणाऱ्या लोकांचे आयुष्य कितीही चांगले असो ते नेहमी दु:खी राहतात. त्यांना इतरांचे सुख बघवत नाही. अशा लोकांपासून दूर राहणे, कधीही चांगले आहे. (Photo : Freepik)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”