-
अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी अलीकडेच गॅस बर्नरवर भाकरी भाजतानाचा व्हिडीओ शेअर केला होता ज्यावर एका चाहतीने कमेंट करून अशी भाकरी भाजल्याने कॅन्सर होण्याची शक्यता असते असे सांगितले होते
-
खरोखरच चपाती किंवा भाकरी गॅसच्या बर्नरवर थेट भाजल्याने असा धोका असतो का याविषयी आजवर झालेले काही अभ्यास व संशोधकांची मते आपण जाणून घेणार आहोत.
-
२०१५ मध्ये एन्व्हायर्नमेंटल सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार, कुकटॉप्स आणि एलपीजी गॅस स्टोव्हमधून नायट्रोजन डायऑक्साइड आणि कार्बन मोनोऑक्साइड यांसारखे अनेक धोकादायक वायु प्रदूषक उत्सर्जित होतात असे सांगण्यात आले होते.
-
जागतिक आरोग्य संस्थेने म्हटल्याप्रमाणे,श्वसन, हृदय व रक्तवाहिन्यांच्या आजरांशी तसेच कर्करोगाशी सुद्धा या प्रदूषक घटकांचा जवळून संबंध आहे. तर न्युट्रिशन अँड कॅन्सर या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अन्य अभ्यासानुसार उच्च तापमानात स्वयंपाक केल्याने श्वास घेण्यास अडथळा निर्माण करणारा कार्सिनोजेन तयार होऊ शकतो
-
टाइम्सने यासंदर्भांत, दिल्लीस्थित मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट व सर गंगाराम हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार, डॉ श्याम अग्रवाल यांच्या हवाल्याने माहिती देत म्हटले की, थेट गॅसच्या आचेवर अन्न शिजवण्याचा संबंध कर्करोगाशी जोडता येणार नाही. हेटरोसायक्लिक अमाइन्स (HCAs) आणि पॉलीसायक्लिक अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स (PAHs) सारखे कार्सिनोजेन्स मानवी शरीराच्या DNA मध्ये बदल घडवू शकतात
-
मात्र डीएनएच्या नुकसानामुळे कर्करोग होतो की नाही हे सांगणे कठीण आहे कारण मानवी शरीरात स्वतः डीएनएची दुरुस्ती करण्याची आणि पेशी उत्सर्जित करण्याची नैसर्गिक यंत्रणा असते.
-
तसेच, जर आपण उच्च-तापमानात तयार केलेल्या स्वयंपाकाचा कर्करोगाशी संबंध जोडत असू, तर अशा व्यक्तीने असे पदार्थ दीर्घकाळापर्यंत सेवन केले आहेत का हे पाहणे महत्त्वाचे ठरते. कारण एक दोन वेळा असे अन्न खाल्ल्याने शरीरात जाणारे घटक हे कर्करोग घडवून आणत नाहीत
-
इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलचे डॉ. दीपांजन पांडा यांनी सुद्धा टाइम्सला २०१० च्या एका अभ्यासाचा दाखला देत सांगितले की, उच्च तापमानावर अधिक पिष्टमय पदार्थ आणि मांस शिजवल्याने प्रो-कार्सिनोजेन रसायनांचे उत्सर्जन होण्याचा धोका असतो पण, म्हणून बर्नर किंवा चुलीवर चपाती/ भाकरी केल्याने कॅन्सर होऊ शकतो, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरेल
-
ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञ डॉ. पॉल ब्रेंट यांनी सुद्धा सांगितले होते की, गॅस किंवा स्टोव्हच्या आगीवर ब्रेड भाजला जातो तेव्हा त्यात ऍक्रिलामाइड नावाचे रसायन तयार होते. मात्र हा अभ्यास मैद्याच्या ब्रेडच्या बाबत झाला होता त्यामुळे तो पोळीला लागू होईलच असे नाही.
-
पोषणतज्ज्ञ श्वेता शाह यांनी टाइम्सला सांगितल्याप्रमाणे अशा प्रकारे पोळी भाजताना कदाचित थोडा वेळ वाचू शकतो पण यामुळे काही वेळा पोळी संपूर्ण भाजलीच जात नाही काही ठिकाणी करपते तर काही ठिकाणी कच्ची राहू शकते ज्याचा नंतर पोटाला त्रास होऊ शकतो
-
त्यामुळे निष्कर्ष काढायचा झाल्यास, पोळी थेट चूल किंवा बर्नरवर भाजल्याने कर्करोग होतोच असे स्पष्ट सांगता येणार नाही पण केमिकलचे उत्सर्जन तसेच जोडणं येणाऱ्या समस्यांना टाळण्यासाठी स्वयंपाकाची अशी पद्धत टाळणेच उत्तम
-
(सर्व फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Ram Navami 2025 Wishes : रामनवमीच्या मराठी शुभेच्छा पाठवा प्रियजनांना, वाचा एकापेक्षा एक हटके संदेश