-
आपले दात पांढरे शुभ्र असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. दात तुमच्या हास्य आणि सौंदर्याचे प्रतीक आहे. रोजचं खाणं-पिणं आणि स्वछतेच्या सवयी पाहता दातांच्या रंगावर अनेकदा परिणाम होतो. त्यामुळे दातांच्या स्वछतेची काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पण, कॉलगेट वापरून सुद्धा अनेकांना दात पिवळे होण्याचा सामना करावा लागतो. तर अश्या परिस्थिती तुम्ही घरातील काही गोष्टी वापरून तुमच्या दातांची चमक पुन्हा एकदा परत मिळवू शकता. (फोटो सौजन्य:@Freepik)
-
चला तर मग जाणून घेऊयात दात स्वछ आणि पांढरे ठेवण्यासाठी घरगुती उपाय… (फोटो सौजन्य:@Freepik)
-
पंधरा ते वीस मिनिटे एक चमचा खोबरेल तेल तोंडात ठेवा. त्यानंतर ब्रश करून घ्या. हा उपाय दातांमधील जंतू कमी करून दात पांढरे शुभ्र ठेवण्यासाठी मदत करेल. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
बेकिंग सोडा आणि ताज्या लिंबाचा रस एकत्र करून पेस्ट बनवा. ही पेस्ट काही मिनिटे दातांवर लावल्यानंतर व्यवस्थित धुवून घ्या. लिंबूच्या आंबटपणासह बेकिंग सोडा दातांवरील पिवळे डाग काढून टाकण्यास मदत करतील. (फोटो सौजन्य:@Freepik)
-
रात्री झोपण्यापूर्वी टूथब्रशच्या मदतीने हळद पावडर दातांवर लावा आणि काही वेळाने स्वछ धुवा. असे केल्याने दातांचा पिवळेपणा दूर होतो. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
सफरचंद सायडर व्हिनेगर दात स्वछ करण्यासाठी आणि दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहे. (फोटो सौजन्य:@Freepik)
-
स्ट्रॉबेरीचे तुकडे आणि एक छोटा चमचा बेकिंग सोडा अशी एक पेस्ट बनवा. स्ट्रॉबेरीमध्ये असलेले मॅलिक अॅसिड पिवळे दात उजळ करण्यास मदत करू शकते.(फोटो सौजन्य:@Freepik)
